ताज्या घडामोडी
आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी लोणविरेत चक्क एकाच वेळी शेळीने, दिला पाच पिल्यांना जन्म .

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
सांगोला तालुक्यातील मौजे लोणविरे येथील श्री.नित्यानंद तुकाराम खर्चे हे शेतकरी असून,त्यांचे शेळीपालन व्यवसाय आहे त्यांच्याकडे दुग्धव्यवसाय साठी गायी म्हशी आहेत.परंतू आज गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांच्या चक्क,शेळीने पाच पिल्यांना जन्म दिल्याने , त्यातील एकही पिल्ले दगावली नाहीत, दोन बोकड तीन पाट अशी पाच पिल्यांना जन्म दिल्याने या पाचही पिलांची प प्रकृती उत्तम असून यामुळे लोणविरेत शेळीपालनात आनंदाचे वातावरण झाले आहे.या गावात बाहेरच्या गावातील नागरीक पाहण्यास येत आहेत. तरी त्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्याने भेट देण्यासाठी वेळीच यावे अशी मागणी येथील नागरीकामंधून होत आहे.



