आपला जिल्हा

सांगोल्याच्या नूतन सभापती पूनम इंगवले यांचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याहस्ते विशेष सत्कार  भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही केला नूतन सभापतीचा सत्कार 

सांगोल्याच्या मिनी मंत्रालयाला राज्याच्या मंत्रालयातून निधीची कमतरता भासू देणार नाही 

सांगोला ; विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

सांगोला पंचायत समितीवरील शेकापची ५५ वर्षांची सत्ता उलथवून लावत भारतीय जनता पक्षाने पूनम इंगवले यांना सभापती पदाची संधी दिली. सांगोल्यात प्रथमच भाजपचा सभापती झाल्याने राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मंगळवार दि. १७ मार्च रोजी मुंबई येथे नूतन सभापती पूनम इंगवले यांचा विशेष सत्कार केला. यावेळी सांगोल्यात ऑपरेशन लोटस यशस्वी करणारे राज्याचे ग्रामविकासमंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारभाऊ गोरे, माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील, भाजपचे जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदार, भाजप नेते बाळासाहेब एरंडे, प्रशांत वलेकर सुदर्शन इंगवले आदी उपस्थित होते. 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नूतन सभापती पूनम इंगवले यांना शुभेच्छा देताना पंचायत समिती म्हणजे ग्रामीण विकासाचे एक सक्षम साधन आहे पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील गोरगरीब गरजू आणि उपेक्षित घटकांना न्याय देण्याच्या सूचना दिल्या यासाठी राज्याकडून लागेल ती मदत पुरवण्यात येईल असा शब्दही यावेळी देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगोलकरांना दिला. 

 

देशात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करून सांगोला पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकविल्याबद्दल नूतन सभापती पूनम इंगवले शिवसेनेचे उपसभापती अजय सरगर तसेच सांगोला पंचायत समितीचे सर्व सदस्य यांचा आणि ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांच्या विश्वासास पात्र राहून आगामी काळात सांगोल्याच्या मिनी मंत्रालयाला राज्याच्या मंत्रालयातून निधीची कमतरता भासू देणार नाही असे अभिवचन यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी दिले त्याचबरोबर यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनीही नूतन सभापती पुनम इंगवले यांचा सत्कार करून सांगोला तालुक्याच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी निधीची कमतरता भासू देणार नाही असे आश्वासन दिले. 

सांगोला पंचायत समितीच्या राजकीय इतिहासात अपवादात्मक परिस्थिती सोडली तर स्थापनेपासून शेतकरी कामगार पक्षाने पंचायत समितीवर एक हाती सत्ता राखली होती. मात्र यंदा प्रथमच सोलापूरचे लोकप्रिय पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगोला तालुक्यात ऑपरेशन लोटस राबवत माजी आमदार शहाजीबापू पाटील आणि दिपकआबा साळुंखे पाटील या दोन मित्रांना एकत्रित आणत सांगोला पंचायत समितीवर भाजप महायुतीचा झेंडा फडकवला. 

 

चौकट ; 

 

१) सांगोल्यात भाजपचा सभापती ; सांगोलकरांना मिळणार रिटर्न गिफ्ट 

 

सांगोला पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाचा सभापती झाल्याने राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री जयकुमारभाऊ गोरे यांनी सांगोलकरांना मोठे रिटर्न गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. सांगोला पंचायत समितीसाठी लवकरच एक भव्यदिव्य आणि सुसज्ज अशी प्रशासकीय इमारत उभी करण्याचा शब्द त्यांनी दिला आहे. लवकरच या इमारतीचे भूमिपूजन सांगोला येथे होईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??