जत व्यापारी संघटना तर्फे सर्व व्यापारी एकमताने केमिस्ट संघटनेच्या या आंदोलनास संपूर्ण पाठिंबा जाहीर

अध्यक्ष : किरण बिज्जर्गी जाहिर पाठिंबा.
जत प्रतिनिधी ः बाबासाहेब साबळे 9637208889
ऑल इंडिया केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन तसेच महाराष्ट्र राज्य केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन आणि सलन्न सांगली जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या वतीने दि. २० मे २०२६ रोजी संपूर्ण देशभर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर बेकायदेशीररीत्या उपलब्ध होणान्या औषधांच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या एकदिवसीय बंदला आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत.
औषध विक्रेत्यांच्या विविध महत्त्ताच्या समस्यांबाबत वेळोवेळी शासनाकडे निवेदने देऊन तसेच प्रत्यक्ष भेटी घेऊनही योग्य तोडगा न निघाल्यामुळे ऑल इंडिया केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन यांनी हा देशव्यापी बंद पुकारलेला आहे.
या पार्श्वभूमीवर जत व्यापारी संघटना आम्ही सर्व व्यापारी एकमताने केमिस्ट संघटनेच्या या आंदोलनास संपूर्ण पाठिंबा जाहीर करत आहोत.



