नूतन आलेले पोलिस उपनिरीक्षक गडदे म्याडम अवैध दारू विक्रीला लगाम घालेल का?”
दारू बंदीसाठी तालुक्यातील महिला, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विरोधात आंदोलनाच्या तयारीत.

सांगोला /विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
भाग.नं.१
सांगोला तालुक्यातील राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र याअगोदर आपल्याच तोऱ्यात असल्याचे दिसत होते. या विभागातील सांगोला येथे पोलिस उपनिरीक्षक गडदे म्याडम तालुक्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रमुख असून आपल्यातील अवैध दारू विक्रीला लगाम घालेल का ? दारूच्या आहारी गेलेल्या पतीच्या पत्नीचे आणि कुटुंबाचे दुःख पुसण्यासाठी आपण आपल्या पदाचा खऱ्या अर्थाने वापर करणार का ? या सारखे असंख्य प्रश्न सांगोला व तालुक्यातील ग्रामीण भागात दारूच्या आहारी गेलेल्या ,आणि दारूमुळे संसार उघड्यावर पडलेल्या तालुक्यातील माता भगिनींविचारत जात आहे. सांगोला तालुक्यातील काही गावे आणि,
देशी दारु
भिंगरी संत्रा
तालुक्यातील काही गावामध्ये अवैध दारू विक्रीवर कारवाई न करता खुलेआम वसुलीचा फंडा राबविणाऱ्या संबंधित दारू बंदी आणि अवैध विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी मनाची तयारी होत नाही. विभागाच्या भोंगळ कारभारावर तालुक्यातील लोकप्रतिनिधी विभागाच्या अधिकाऱ्यांना सह सर्व सामान्य नागरिक मात्र बेहाल झाले आहेत. त्याम के की काय तालुक्यातील अनेक सामाजिक संघटनेत अग्रेसर असणाऱ्या महिला या विभागाच्या विरोधात महिलांचा मोर्चा काढण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कोणतीही लोक हिताची माहिती देताना दिसत नाहीत. या विभागाच्या गडदे म्याडम यांनी अनेक राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकारांना न जुमानता त्या अवैध दारू विकृती कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.या अगोदरचा कारभार अपुऱ्या कर्मचाऱ्यांचे कारण सांगून हेच लोकांचे लोकसेवक कारवाई पासून पळ काढताना दिसत आहेत. आपण करत असलेल्या कामावर कोणीच आक्षेप घेत नाहीत, म्हणून या अधिकाऱ्यांचा मुजोरपणा वाढला असल्याचे जनमानसातून बोलले जात आहे.
सांगोला तालुक्यात शांतता आणि सुव्यवस्था उत्कृष्ठपणे ठेवण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे आणि त्यांची टीम बजावीत असताना, अवैध दारू विक्रीवर बंदी घालण्याचे कार्य राज्य उत्पादन विभागाचे असताना हा उपविभाग मात्र कोमात असल्याचे दिसून येत आहे. सांगोला पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यावर अनेक ठिकाणी धाडी टाकून गुन्हे दाखल केले आहेत. मात्र राज्य उत्पादन विभागाला मात्र पोलिसांच्या या कामगिरीचे सोयर सुतक नसल्याचे दिसून येत आहे. कारवाई आणि कर्तव्य नको, मात्र जबाबदारीची जाणीव करून दिली की अपुऱ्या मनुष्य बळाचे कारण देत वेळ मारून नेण्याची हातोडी या साहेबांची कमालीची उत्कृष्ट असल्याचे अनेकांनी अनुभवली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उप विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मात्र डोळ्याला पट्टी बांधून शांत आहेत, अवैध दारू विक्री बंद करून तालुक्यात शांतता राखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कार्य करावे, अशी मागणी सामान्य
जनतेतून केली जात आहे.



