ताज्या घडामोडी

राजेवाडी आणि निरा उजवा कालव्यातील वितरकांना वेळेत पाणी सोडण्यासाठी बैठक; अधिकाऱ्यांना लवकरात लवकर पाणी सोडण्याच्या आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांच्या सूचना

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

राजेवाडी तलाव आणि निरा उजवा कालव्याच्या काही वितरकांना अद्याप पाणी सोडण्यात आलेले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आज आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर पाणी सोडण्याचे निर्देश देण्यात आले.

निरा उजवा कालवा विभाग (फलटण) अंतर्गत राजेवाडी (म्हसवड) तलाव आणि निरा उजवा कालव्याच्या विविध वितरकांमधून शेतीसाठी पाणीपुरवठा होतो. माण, आटपाडी, सांगोला, माळशिरस आदी भागातील शेतकऱ्यांना या कालव्यावर अवलंबून राहावे लागते. मात्र, काही वितरकांमधून पाणी अद्याप सोडले नसल्याने उन्हाळी पिकांना पाण्याची टंचाई भासत होती. यामुळे शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती.

आज झालेल्या बैठकीत आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख,श्री. मोरे साहेब कार्यकारी अभियंता

नीरा उजवा कालवा व राजेवाडी तलाव , फलटण 

श्री राजेंद्र धोत्रे साहेब उपविभागीय अधिकारी निरा उजवा कालवा ,पंढरपूर पाटबंधारे विभाग तसेच शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी बैठकीत चर्चा करताना, ज्या वितरकांना अजूनही पाणी सोडण्यात आलेले नाही, त्यांना तातडीने आणि वेळेत पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले. पाण्याचे समन्यायी वाटप, अनधिकृत उपसा रोखणे आणि दुरुस्तीच्या कामांमुळे होणारा विलंब टाळणे यावरही चर्चा करण्यात आली.

यावेळी बोलताना आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख म्हणाले की “राजेवाडी तलाव आणि निरा उजवा कालव्याच्या टेल एंड भागातील शेतकऱ्यांना नेहमीच पाणी मिळण्यात अडचणी येतात. आजच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी लवकर पाणी सोडण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे पिकांना जीवदान मिळेल.”यावेळी ज्या ठिकाणी कालव्याच्या देखभाल-दुरुस्तीचे काम चालू आहे ते वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून पाण्याची गळती आणि अपव्यय टाळता येईल. सदरच्या बैठकीनंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार पाणी सोडले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून त्यासाठी त्यांनी आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख यांचे आभार मानले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??