सांगोला पोलिसांची उत्तम कामगिरी, मोबाईल चोरणारा पोलिसांच्या जाळ्यात.

सांगोला / विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
सांगोला शहरातील काही दिवसापूर्वी सुर्योदय मोबाईल शॉपी वासुद चौक सांगोला येथे दुकानाच्या वरील पत्रा उचकटुन पी.ओ. पी. तोडुन आरोपीने चोरी केली होती. सांगोला पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर १०२०/२०२५ बी.एन.एस.३३४ (१),३३१(४), ३०५ प्रमाणे दिनांक २३डिसेंबर २०२५ वा.दाखल आहे. सदर गुन्ह्यांत सुर्योदय मोबाईल शॉपी वासुद चौक सांगोला येथे दुकानाच्या वरील पत्रा उचकटुन पी.ओ. पी. तोडुन आत प्रवेश करून रु. ३,९०,५००/- किंमतीचा वेग वेगळे मोबाईल फोन चोरी झाले आहेत अशी तक्रार दाखल केली होती. तरी दिनांक २४ मार्च २०२६ रोजी त्यापैकी एक मोबाईल ट्रेस करून त्याची पुर्ण माहिती घेवून बागलकोट राज्य कर्नाटक येथुन आरोपी अक्षय शांताराम इंदुलकर वय ३६ वर्षे रा. नवा नगर, बागलकोट राज्य कर्नाटक यास अटक करून त्याचेकडून एकुण २० मोबाईल त्याची अंदाजे किंमत ३० लाख ३० हजार रूपयाचा मुद्देमाल मिळाला आहे. तरी सदरची कामगिरी श्री. अतुल कुलकर्णी, मा. पोलीस अधिक्षक साो. सोलापूर ग्रामीण, श्री. प्रितम यावलकर मा. अपर पोलीस अधिक्षक, श्री.बसवरान शिवपुजे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो, मंगळवेढा उपविभाग मंगळवेढा, पोलीस निरीक्षक श्री. विनोद घुगे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. दत्ता वनाळे, विशाल भोसले व पोकॉ. शहाजहान शेख व सायबर पोलीस ठाणेकडील पोकॉ. राहुल सोनकर यांनी केलेली आहे.



