ताज्या घडामोडी

सांगोला पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी,वकीलास मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर वकिलांकडून ऑनलाइन तक्रार दाखल

सांगोला ; विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

संपूर्ण राज्यभर गाजत असणाऱ्या सांगोला येथील वकील मारहाण प्रकरणी अखेर वादग्रस्त पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्यावर या प्रकरणातील पीडित वकील ॲड. सागर मेटकरी यांनी तक्रार दाखल केली आहे. सोमवार दि. ६ एप्रिल रोजी ऑनलाईन पद्धतीने ही तक्रार दाखल केली आहे.

 

ॲड सागर मेटकरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मंगळवार दि ३१ मार्च रोजी तक्रारदार यांच्या नातेवाईक रावसाहेब मेटकरी यांनी रात्री ९.३० च्या सुमारास ॲड सागर मेटकरी यांना सांगोला पोलीस स्टेशन मध्ये बोलावले होते. यावेळी ते सांगोला पोलीस स्टेशनच्या आवारात उभे असताना पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी तु इथे कशाला आला आहेस ? असे तक्रारदार ॲड सागर मेटकरी यांना विचारले. यावेळी त्यांच्यासमवेत ५ ते ६ पोलीस कर्मचारी त्यांच्यासमवेत आले होते. यावेळी ॲड. मेटकरी यांनी मी वकील आहे, आणि माझे नातेवाईक रावसाहेब मेटकरी यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी मी इथे आलो आहे असे सांगितले. यावर पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी ॲड सागर मेटकरी यांना तू वकील असला तर जे काही आहे ते कोर्टात बघ, इथे यायचे नाही असे म्हणून ॲड मेटकरी यांना कानाखाली लगावली. यावर ॲड मेटकरी यांनी मी एक वकील आहे तुम्ही मला विनाकारण मारहाण करू शकत नाही असे म्हटले यावर चिडलेल्या पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी ॲड सागर मेटकरी यांना आईवरून शिवीगाळ केली आणि ॲड मेटकरी यांच्या कॉलरला धरून घुगे व कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनच्या बाजूला असणाऱ्या पत्र्याच्या खोलीत नेले व ॲड. मेटकरी यांना आणखी मारहाण केली व त्याचा मोबाईल काढून घेतला आणि याबाबत तू कुणाला तक्रार केली तर तुला या गुन्ह्यामध्ये अडकवून जेलमध्ये सडवीन अशी धमकी दिली. आणि ॲड मेटकरी यांच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या असेही दाखल केलेल्या तक्रारीत नमूद आहे. 

 

चौकट ; 

 

पोलीस निरीक्षक विनोद घुगे आणि त्यांच्या ५ ते ६ पोलिसांनी केलेल्या मारहाणीबाबत मी २ एप्रिल रोजी सांगोला पोलीस स्टेशनला लेखी निवेदन दिले होते मात्र याप्रकरणी पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने आज मी माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल केली आहे. 

 

ॲड सागर मेटकरी 

सांगोला.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??