भिमरत्न तरुण मित्र मंडळ डिकसळ अध्यक्षपदी बाळु गंगणे तर उपाध्यक्षपदी सागर शिवाजी मागाडे यांची बिनविरोध निवड. मिरवणूकीला डि.जे. बंद सर्वानुमते निर्णय.

सांगोला /विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
डिकसळ येथील भिमरत्न तरुण मित्र मंडळ अध्यक्षपदी बाळु गंगणे तर उपाध्यक्षपदी सागर शिवाजी मागाडे यांची सर्वानुमते रविवारी दिनांक ०५/०४/२०३६ रोजी निवड करण्यात आली आहे. झालेल्या वार्षिक बैठकीचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या वर्षीची नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली.
यामध्ये डि.जे . मुक्त निर्णय घेण्यात आला असून पारंपरिक पद्धतीने वाद्य बॅंड च्या पध्दतीने मिरवणूक दि.29 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता काढण्याचा निर्णय मंडळाने घेतला.या प्रसंगी

खजिनदार विकास गंगाधर गंगणे,सरचिटणीस सुनील बाबर कार्याध्यक्ष भाऊसाहेब गेजगे, सदस्य 1) विकास सिद्राम गंगणे ,संजय बाबर ,श्रीकांत गंगणे ,संजय कांबळे , रणजित गंगणे , जालिंदर गंगणे ,सागर मागाडे उपस्थित होते.यावेळी नुतन अध्यक्ष बाळू गंगणे यांनी शांततेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत पार पाडायची असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी रंणजीत गंगणे यांनी आभार मानले.



