ताज्या घडामोडी

नो डीजे, नो डॉल्बी, पारंपारिक वाद्याच्या माध्यमातून जयंती उत्सव साजरी करा..- पोलीस निरीक्षक विनोद घुगे

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त नाझरे येथे बैठक..

सांगोला विशेष प्रतिनिधी /

विकास गंगणे 

मो.9881583935

 

     महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवात लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनी सामील होऊन उत्साहाने साजरी करा परंतु मिरवणुकीत नो डीजे, नो डॉल्बी, पारंपारिक वाद्याच्या माध्यमातून जयंती उत्सव साजरा करा. व उत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा भंग केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल अशा सूचना पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी नाझरे ग्रामपंचायत मध्ये जयंती निमित्त बैठकीत दिल्या. 

     तसेच रात्री चोरासारखे पुतळे आणून बसवू नका व गावाला वेगळे वळण लावणारा ची गय करणार नाही व डॉक्टर बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेऊन जयंती उत्सव उत्साहाने साजरा करा असेही पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी बैठकीत सांगितले. सदर प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक पोपट काशीद, पोलीस हवालदार सुजित जाधव, भानवसे, मा. सरपंच सुनील कांबळे, डॉ. विजय सरगर, मधुकर ढोबळे, आरपीआय अध्यक्ष सुरेंद्र ढोबळे, संदिपान पवार, अमोल काळोखे, शुभम ढोबळे, महादेव ढोबळे, गणेश ढोबळे, अनिकेत पवार, प्रवीण ढोबळे, विनोद पवार, सुभाष पवार, पोलीस पाटील लक्ष्मण बनसोडे, गौतम साठे, अण्णा ढोबळे, आनंदा कोकरे, सचिन कोकरे, तुकाराम वाघमोडे, दत्ता सरगर, नितीन टिंगरे व समाज बांधव उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??