केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांचा सांगोला दौरा नराळे येथे शोकसभेसह विविध भेटी कार्यक्रम

सांगोला /विकास गंगणे
मो.9881583935
रामदास आठवले हे शनिवार, ३० मे रोजी सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
दुपारी ३.३० वाजता नराळे ग्रामपंचायत पटांगण येथे दिवंगत नितीन जगन्नाथ वाघमारे यांच्या स्मरणार्थ शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. या शोकसभेस माजी मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती, जिल्हा परिषद सोलापूर चेतनसिंह केदार सावंत, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, राज्य संघटक सुनील सर्वगोड, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस जितेंद्र बनसोडे, सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, सरचिटणीस रवि गायकवाड, पक्ष निरीक्षक सांगोला चंद्रकांत वाघमारे यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत.
यानंतर दुपारी ४.१५ वाजता हंगिरगे येथे बिरा लांडगे यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता जवळा येथे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या आई स्वर्गीय शारदादेवी यांच्या स्मृतिस्थळास भेट दिली जाणार आहे.
सायंकाळी ६ वाजता सांगोला
येथे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे वडील स्वर्गीय पोपटराव गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल सांत्वनपर भेट दिली जाणार आहे. त्यानंतर महूद-वेळापूर-अकलूज-इंदापूर मार्गे पुण्याकडे प्रस्थान होणार आहे. तरी सांगोला तालुक्यातील जिल्हा पदाधिकारी, मातंग आघाडीचे पदाधिकारी, तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी, युवक आघाडीचे पदाधिकारी यांनी या दौऱ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच नराळे येथे दुपारी ३ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष खंडू (तात्या) सातपुते, युवक आघाडी तालुकाध्यक्ष सौदागर सावंत आणि मातंग आघाडी तालुकाध्यक्ष शहाजी माने यांनी केले आहे.



