ताज्या घडामोडी

सिंघम’ अधिकारी पंकज कुंभार यांचा सांगोल्यात दणका;

राज्य उत्पादन शुल्क ॲक्शन मोडवर; अवैध दारू विक्रेत्यांत खळबळ

सांगोला/विकास गंगणे

पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूने २० जणांचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच *राज्य उत्पादन शुल्क विभाग* खडबडून जागा झाला.सांगोल्यातील संगम ब्रॅडी हाऊसच्या समोर टपऱ्यांमधून मिळतेय अवैध दारू आणि मद्यपींचा होतोय सर्वसामान्य नागरिकांना त्रास या मथळ्याखाली २७ मे ला बातमी प्रसारित केली होती.त्याचवेळी पंढरपूर विभागाचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पंकज कुंभार यांनी संपादकांना फोन करून चार दिवसात कारवाई करणार असल्याचे सांगितले होते, त्यांनी तात्काळ या बातमीच्या अनुषंगाने माहिती घेवून रविवार दिनांक ७ जून रोजी कारवाई केली. या कारवाईने सर्वसामान्य नागरिकांनी निरीक्षक पंकज कुंभार यांचे अभिनंदन केले.
राज्य उत्पादन शुल्क विभाग पंढरपूरचे ‘सिंघम’ अधिकारी, निरीक्षक पंकज कुंभार यांनी सांगोल्यात धडक कारवाई केल्याने अवैध दारू आणि हातभट्टी विक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.

चौकट:१)

*रविवारी रात्री ‘ऑपरेशन’*

*रविवार दि. ०७ जून २०२६* रोजी रात्री *८ ते ९:३०* च्या दरम्यान निरीक्षक पंकज कुंभार यांच्या पथकाने सांगोला शहरातील *संगम ब्रँडी हाऊस*समोर छापा टाकला. संगम ब्रँडीतून दारू घेऊन समोरच असलेल्या टपऱ्यांवर बसून उघड्यावर दारू पिणाऱ्या मद्यपींवर व अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. तसेच दंडात्मक कारवाई करण्यात आली.

चौकट २)

*सहा महिन्यांपासून सर्व सामान्य नागरिक, व्यापारी त्रस्त*

गेल्या सहा ते सात महिन्यांपासून या गजबजलेल्या चौकात मद्यपींचा हैदोस सुरू होता. रस्त्यावरून जाणाऱ्या महिला, शाळकरी मुली व सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. रहदारीलाही अडथळा निर्माण होत होता. राज्य उत्पादन शुल्कच्या कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

चौकट ३)

*‘अवैध आणि हातभट्टी व्यवसायांची माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त राहील’ : पंकज कुंभार यांचा इशारा*

“सांगोला शहरात तसेच तालुक्यातील गावातील प्रमुख चौकात व तक्रारीनुसार अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर या पुढेही कठोर कारवाई सुरूच राहील. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवून अशा अड्ड्यांवर व अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर खडक कारवाई करू,” असा इशारा निरीक्षक पंकज कुंभार यांनी दिला.

सदर कारवाई *राज्य उत्पादन शुल्कच्या जिल्हा अधीक्षक जाधव मॅडम* व *उपअधीक्षक आदाटे साहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पंकज कुंभार आणि त्यांच्या टीमने केली. यावेळी *सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुधीर गवळी* यांनीही आपले कर्मचारी पाठवून टपऱ्यांवरील कारवाईस सहकार्य केले.

चौकट ३)

*‘आठवड्यातून दोनदा कारवाई हवी’ – नागरिकांची मागणी*
ही कारवाई कौतुकास्पद असली तरी, “एकदिवसीय कारवाईने प्रश्न सुटणार नाही. किमान आठवड्यातून एक-दोनदा धडक कारवाई झाली तरच मद्यपींचा वावर कमी होईल,” अशी अपेक्षा सुज्ञ व्यापारी व नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??