शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांच्या पत्रकारांवरील शिवीगाळ व धमकीचा तीव्र निषेध तात्काळ गुन्हा दाखल करा अन्यथा आंदोलन करु – माजी :सभापती अनिल मोटे “पत्रकारांवर हात उठवला तर , स्टाइलने उत्तर देऊ”

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
शिवसेना (शिंदे गट) खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अश्लाघ्य शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना निषेधार्ह असल्याची मा . सभापती अनिल मोटे यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी खासदारांनी तात्काळ सार्वजनिक माफी मागितली आहे. पण आता पोलिस यंत्रणेने तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे
माजी सभापती अनिल भाऊ मोटे मोटे यांनी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे . पत्रकाराशी बोलताना मोटे म्हणाले की, “पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यांना धमकावणे, शिवीगाळ करणे किंवा हात लावण्याचा प्रयत्न करणे हा हल्ला आहे.”
“पत्रकारांना हात लावण्याचा प्रयत्न कुणीही केला, तर स्टाईलने उत्तर दिले जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सांगोला तालुक्यात माजी सभापती अनिल मोटे यांचा चळवळीचा इतिहास चांगलाच माहिती आहे, हे विसरू नका.
या घटनेचा गंभीरपणे निषेध करताना पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कारवाईची मागणी मोटे यांनी केली आहे.



