छत्रपती शाहू महाराज यांची 152 वी जयंती उत्साहात साजरी

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
जि.प.प्राथ.शाळा भिमनगर सांगोला येथे आज दिनांक 26 जून 2026 रोजी लोक कल्याणकारी राजा शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली शेळके मॅडम यांनी केली.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छ.शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आले.
बहुजनांचे नेतेआयु.बापूसाहेब ठोकळे सर यांनीआपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या,पेन, पेन्सिल, इत्यादी शैक्षणिक साहित्याचे भरभरून वाटप केले. शिक्षक, विद्यार्थी, प्रतिष्ठित नागरिक, अंगणवाडी सेविका, मदतनीस व पालक या सर्वांच्या उपस्थितीत बहुजनांचे नेते बापूसाहेब ठोकळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याविषयी आयु.बापूसाहेब ठोकळे आयु.अरुण भाऊ केदार, प्राध्यापक डॉ. प्रकाश बनसोडे,आयु.बाबासाहेब बनसोडे, आयु शहाजी गडहिरे यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या वेळी सांगोला नगरपरिषदेच्या नगरसेविका आयु.गोदाबाई बनसोडे,ऍड.आनंदा बनसोडे आयु.के.डी.बनसोडे,आयु. वैभव भोरकडे,आयु.प्रवीण सूर्यगंध, आयु.जयंती बनसोडे, आयु.लक्ष्मीबाई बनसोडे, आयु.प्रियांका बनसोडे व बहुसंख्येने पालक वर्ग आपण सर्वजण वेळेत उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल शिक्षिका आयु.मैना गायकवाड यांनी उपस्थित मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.



