राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी.सभापती अनिल मोटे यांनी घेरडी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे

सांगोला/ विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
सांगोला : मौजे घेरडी (ता. सांगोला) ग्रामपंचायतीने सन २०२०-२०२१ ते २०२५-२०२६ या कालावधीत शासनाच्या विविध योजनांतील कामांमध्ये संगनमताने मोठा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप जिल्हा परिषद सोलापूरचे माजी कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती अनिल तानाजी मोटे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून सखोल चौकशी समिती नेमण्याची मागणी केली आहे.
परंतु त्या भ्रष्टाचाराच्या चौकशी साठी, तपासणी कामी नेमणूक अधिकारी घेरडी ग्रामपंचायत ला आले असता, ग्रामसेवक सरपंच सहकार्य करित नाही, म्हणून माजी सभापती घेरडी गावचे अनिल मोटे यांनी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे.
मोटे यांनी दि. ३ जून २०२६ कार्यकारी रोजी मुख्य अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, दि. ४ मे २०२६ रोजी ग्रामस्थांसह रितसर तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील काही अधिका-यांनी संगनमत करून अनेक विकासकामांमध्ये आर्थिक अनियमितता केल्याचा आरोप
त्यांनी केला आहे.
तक्रारीनुसार, ग्रामपंचायतीत टेंडर प्रक्रिया न राबवता एकाच व्यक्तीच्या नावे विविध कामांची बिले काढण्यात आली. नोंदणीकृत ठेकेदार नसताना एकाच कामाचे वेगवेगळे टप्पे दाखवून बी-१ मंजुरी घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ऑनलाइन टेंडर प्रक्रियेत टेंडर आयडी आणि गावाचे नाव यामध्ये फेरफार करून माहिती लपविण्यात आल्याचेही मोटे यांनी म्हटले आहे.
याशिवाय, सॅनिटरी नॅपकीन पॅडची प्रत्यक्ष खरेदी न करता बिले काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. पारे रोड ते गावठाण या भागात शाश्वत पाण्याचा स्रोत नसतानाही पाणीपुरवठा पाईपलाईनची कामे दाखवून निधी खर्च करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनांतील साहित्य खरेदी न करता बिले काढणे आणि बाजारभावापेक्षा जास्त दराने खरेदी दाखविणे अशा प्रकारे निधीचा अपव्यय झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
घेरडी ग्रामपंचायतीच्या सन २०२१ पासून आजअखेरपर्यंतच्या सर्व कामांची सखोल चौकशी करण्यात यावी,
या तक्रारीमुळे सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायत कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला असून, जिल्हा परिषद प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे
चौकट अनिल मोटे यांनी घेरडी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले असून, शासकीय कामात अडथळा आणला म्हणून, सरपंच व सदस्यांना सोबत घेऊन पंचनामा केला आहे.वरीष्ठांना अहवाल पाठवणार.
*घेरडी ग्रामपंचायत अधिकारी बी.वाय.कोळी


