ताज्या घडामोडी

आ. डॉ.बाबासाहेब देशमुख यांना सांगोला पोलीस स्टेशन घेतय , हालक्यात

विधानसभेत अवैधरित्या धंद्यासंदर्भात आवाज उठवून देखील अवैधरित्या धंदे जोमात..

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असून प्रशासन मात्र मूकदर्शक असल्याचा आरोप करत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी हा गंभीर मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षा आणि सामाजिक वातावरणावर याचा विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी सपष्ट सांगितले.तसेच 

अवैध वाळू उपसा करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविला जात आहे. आयपीएल व मटका जुगारामुळे तरूण पिढी व्यसनाधीन होत आहे. गुटख्यामुळे आरोग्य धोक्यात येत असून अवैध देशी दारमुळे अनेक कुटुंबे उधवस्त होत आहेत, असे त्यांनी विधानसभेत लक्षात आणून दिले. अन व औषध प्रशासन विभाग,

पोलिस विभाग, महसूल विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी समन्वयाने काम करून या अवैध धंध्यांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. संबंधित अधिकान्यांनी केवळ दिखावा न करता जमिनीवर उतरून प्रत्यक्ष कारवाई करावी, अशी तंबीही त्यांनी दिली.

परंतु सांगोला व ग्रामीण भागात विनापरवाना भरदिवसा अवैधरित्या धंदे पोलीसांच्या आशीर्वादाने जोमाने चालत आहे.

 

◼️सांगोला तालुक्यातील नागरिकांच्या हितासाठी अवैध धंद्यांवर आळा घालणे अत्यावश्यक आहे. प्रशासनाने जागे होऊन कठोर पावले उचलावीत.◼️ –

 

* *आ. डॉ. बाबासाहेब देशमुख*

ना वरिष्ठांचा धाक ना कर्तृत्वाचा झेंडा , पोलिसांना सुटेना वसुलीचा मोह .

 दिवसेंदिवस चर्चेत सहभागी सांगोला पोलिस स्टेशन यांच्या कृपाशीर्वादामुळे, अवैधरीत्या धंद्याला ऊत आला असून, तालुक्यातील बिट मधील पोलिसांमार्फत अधिकाऱ्यांला मंथली हप्ता असल्याने, कारवाई मात्र शून्य अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सांगोला व ग्रामीण भागात अवैधरीत्या धंद्याच्या नावाखाली लूट सुरुच आहे .संबंधित असणारे वरिष्ठ अधिकारी आणि पोलिस कर्मचारी मात्र वसुलीचे काम अतिशय जोमाने करत आहेत. सर्वसामान्य नागरिक ,महीला आणि वाहनधारकांमधून पोलिसांच्या विरोधात तीव्र नाराजी पसरली आहे.हाप्त्याला आधी’ न कामाला कधी? सांगोला तालुक्यातील पोलिस 

 बीट मधील वरिष्ठ अधिकारी आणि त्यांचे पोलीस कर्मचारी हे कोणत्याही पद्धतीने अवैधरीत्या धंदे रोखण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत नाहीत . दारु धंदेवाला बोलतो की, आमचे मंथली हप्ते असल्याने आम्ही कोणाला घाबरत नाही.तसेच काही बीटचे पोलिस त’र्रच असतात.

तरी पण वरिष्ठ अधिकारी तर मूग गिळून गप्प बसले आहेत. तर पोलिस कर्मचारी मात्र पठाणी वसुली करीत असल्याचे

 

चित्र दिसून येत आहेत. येणाऱ्या काळात

 

संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला जाईल असा इशारा अनेक सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्याऱ्यांनी दिला आहे.

 

    कामचूकार पोलिसांची लवकरच गडचिरोली सारख्या ठिकाणी बदली करण्याची मागणी आता महीला व सामाजिक कार्यकत्यांकडून होत आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??