ग्रामीण भागात नागरीकांच्या जिवाशी खेळ,भेसळ खोरांवर चाप कधी बसणार ?
डेअरी व्यावसायीक आणि मिठाई खाद्य पदार्थमध्ये मोठया प्रमाणात भेसळ

सांगोला/ विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
संपूर्ण राज्यभरात भेसळ खोरावर कारवाईचा बडगा सुरु असून, दुध डेअरी व्यवसाय, मिठाई व्यावसाय, तसेच हॉटेल व्यवसाय इत्यादी मध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ सुरु असून सांगोला तालुक्यातील काही ग्रामीण भागात अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई झाली नाही. ग्रामीण भागातील सामान्य जनतेच्या आरोग्या विषयी प्रशासन निष्काळजी पणा करत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे शहरामध्ये कारवाईचा धुमाकूळ सुरु असून अन्न व औषधं प्रशासन चे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कामगिरी विषयी सर्वत्र कौतुक होत आहे. आणि एकीकडे ग्रामीण भागात मात्र सगळीकडे शुकशुकाट असून अनेक भेसळखोर अगदी मोकाट पणे आपल्या तुंबड्या भरत आहेत. सार्वजनिक ठिकाणी असणारी मिठाई ची दुकाने
यामध्ये मिळणारा माल आजवर कधीच अन्न औषधं प्रशासनाकडून तपसाला गेला नाही. यामध्ये मिळणारे विविध खाद्य पदार्थ अगदी बिनधास्त पणे विक्री केले जातात. नागरिकांच्या आरोग्याचा कोणताच विचार होताना दिसत नाही. तसेच डेअरी व्यवसाय हा मूळ ग्रामीण भागात खुप मोठया प्रमाणात आहे. इथूनच शहराकडे दुध वितरित केले जाते. परंतु इथल्या दुधाची प्रत कधी तपासली जात नाही. यामुळे अनेक आरोग्य विषयक प्रश्न निर्माण होत आहेत. एकीकडे धाडसी तुकाराम मुंडे आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक ठिकाणी कारवाई सत्र सुरु ठेवत आहेत तर एकीकडे सोलापूर जिल्हातील अन्न प्रशासन विभागाचे अधिकारी कारवाई करणारे आशिर्वादामुळे चालवत आहेत ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करुन नागरिकांच्या आरोग्याचा खेळ करत आहेत. ग्रामीण भागातील भेसळ खोर इतके मोकाट पणे आपला व्यवसाय कोणाच्या ? हा प्रश्न सामान्य नागरिकाला पडत आहेत.



