आपला जिल्हा

आम.डॉ बाबासाहेब देशमुख यांचा आदर्शवत निर्णय दोन दिवस वारकरी बांधवांना देणार आरोग्यसेवा

सांगोला /विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. पायी वारीत वारक-यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.निकिताताई देशमुख यांनी पुढाकार घेतला असून बुधवार 22 जुलै व गुरुवार दि. 23 जुलै रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर, सांगोला येथे वारकर्‍यांसाठी आरोग्यसेवा देणार आहेत.

आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा गाभा आहे. पंढरीत जाण्यापूर्वी थकलेल्या भाविकांची सेवा व वारकर्‍यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.निकिता ताई बाबासाहेब देशमुख यांनी स्वतः दोन दिवस रात्रंदिवस वारकर्‍यांची सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे.

याप्रसंगी आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांचेकडून वारकर्‍यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांची माहितीही दिली जाणार आहे. खांद्यावर भगवी पताका आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पंढरीची वाट चालणार्‍या हजारो वारकर्‍यांना आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.निकिता ताई देशमुख हे वारकर्‍यांना वैद्यकीय सेवा देणार असल्याच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

तरी सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटनेच्या सर्व पदाधिकार्‍यांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??