ताज्या घडामोडी

गणेशोत्सव कालावधीत ठाणे व नवी मुंबई परिसराकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी; महामार्ग सुरक्षा पथकाचे आवाहन

सांगोला विशेष प्रतिनिधी 

/विकास गंगणे 

मो.9881583935

 

पुणे – गणेशोत्सव २०२६ च्या कालावधीत ठाणे शहर पोलीस आयुक्तालय तसेच नवी मुंबई परिसरामध्ये गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुका सुरळीत पार पाडण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या जड-अवजड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना विशिष्ट दिवस व वेळेत प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.

 

अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या सूचनेनुसार महामार्ग सुरक्षा पथक, पुणे परिक्षेत्राकडून या अधिसूचनेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे.

 

जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी असणारे दिवस व वेळ :

 

– दि. १८/०९/२०२६ रोजी सकाळी ०९.०० ते रात्री २४.०० वाजेपर्यंत विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत.

– दि.१९/०९/२०२६ रोजी व २०/०९/२०२६ सकाळी ०९.०० ते रात्री २१.०० वाजेपर्यंत गौरी गणपती विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत.

– दि. २५/०९/२०२६ (अनंत चतुर्दशी) : रात्री ००.०१ वाजल्यापासून ते विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत

 

महत्त्वाच्या सूचना व आवाहन :

 

१. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (Expressway) तसेच पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरून ठाणे / नवी मुंबईकडे जाणाऱ्या जड वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.

२. सर्व वाहनधारक व ट्रान्सपोर्टर्सनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??