ताज्या घडामोडी

साहेब, आम्ही काय पाकिस्तानात राहतो का विद्यार्थी व नागरिकाच्या जीवाशी विजेचा खेळ थांबवा शिक्षक नेते उत्तम सरगर वझरे विद्युत उपकेंद्राचे काम रोखणार.‌.-वझरे ग्रामस्थ

सांगोला/ विकास गंगणे 

        साहेब विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत, किमान विद्यार्थ्यांसाठी तरी वजरे गावात व वाडी वस्तीवर रात्रीची लाईट सुरु करा, दिवसा थांबवा परंतु रात्री वीज द्या, आम्ही भारतातच राहतो, पाकिस्तानात नाही हे लक्षात घेऊन विद्यार्थी व नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबवा अन्यथा वेगळा मार्ग करावा लागेल असा खणखणीत इशारा शिक्षक नेते उत्तम सरगर यांनी नाझरे ता. सांगोला येथे महावितरण कार्यालय दिला आहे. यावेळी शेतकरी, पालक मोहन रेड्डी, राजू पाटील, नितीन पाटील, महादेव वाघमोडे, आनंदा कोकरे, सचिन कोकरे, बाळासो वाघमोडे व ग्रामस्थ उपस्थित होते. 

     सुमारे चार ते पाच महिने झाले वझरे गाव व वाड्या रस्त्यावर रात्रीची लाईट नाही व या संदर्भात वजरे ग्रामस्थ आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याकडे ग्राहाणे सांगितले तरी यामध्ये आमदारांनी सूचना देऊनही अद्याप रात्रीची लाईट नाही व त्यामुळे वझरे ता सांगोला येथे विजेच्या प्रश्नाने दिवसा पेट घेतला असून, महावितरण अधिकारी निवास नरबट यांना विजेची सुधारणा करा अन्यथा वेगळा मार्ग अवलंबिला जाईल असा खणखणीत इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. 

 वझरे विद्युत उपकेंद्राचे काम रोखणार.. इंजि. राजू पाटील 

    साहेब वारंवार सांगूनही वजरे येथील विजेचा प्रश्न सुटत नाही मग सांगा आम्ही जगायचे काम मरायचे तर विजेचा प्रश्न न सुटल्यास येत्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी आम्ही गावकरी वझरे विद्युत उपकेंद्राचे काम थांबविणार असा इशारा इंजिनीयर राजू पाटील यांनी शाखा अभियंता निवास नरबट यांना दिला आहे. प्रथम गाव व वाड्या वस्तीस रात्रीची वीज द्या मगच उपकेंद्राचे काम सुरू करा अशी ग्रामस्थांची मागणी असल्याचे सांगितले. व याबाबत आम्ही उपकेंद्राचे काम थांबविणार. 

_____________________________

 

     वझरे गाव व वाड्या वस्त्याचा विजेचा प्रश्न सोडवू

     वझरे गावाने विजेचा प्रश्न सुटावा म्हणून विद्युत उपकेंद्र उभारण्यात जागा दिली परंतु सध्या रात्रीची लाईट नाही ही मागणी लक्षात घेता यावर येते पंधरा ते वीस दिवसात विजेचा प्रश्न प्राधान्य देऊन सोडवू.. मधुकर साळवे 

कार्यकारी अभियंता महावितरण पंढरपूर विभाग.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??