ताज्या घडामोडी

राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील देणार जवळा विकास सोसायटीला भेट शनिवार १९ सप्टेंबर रोजी सहकारमंत्र्यांचे जवळ्यात आगमन  

सांगोला ; विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचे विशेष लक्ष असणाऱ्या राज्यातील अग्रगण्य विकास सेवा सोसायटी म्हणून लौकिक असणाऱ्या जवळा विविध कार्यकारी सहकारी संस्थेस राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील भेट देणार आहेत. शनिवार १९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता सहकार मंत्री जवळा येथील संस्थेच्या कार्यालयास भेट देणार आहेत. यावेळी संस्थेचे मार्गदर्शक माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत अशी माहिती जवळा सोसायटीचे चेअरमन सुनील आबा साळुंखे यांनी दिली. 

माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवळा येथील विविध कार्यकारी संस्था राज्यातील अत्यंत नामांकित सहकारी संस्था म्हणून ओळखली जाते. १९४६ पासून सलग ८० वर्षे या संस्थेवर पूर्वी स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील व नंतर माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या गटाचे वर्चस्व राहिले आहे. स्थापनेपासून सातत्याने ही संस्था अ वर्गात आहे. या विकास सेवा सोसायटीची उलाढाल कोट्यावधी रुपयांची असून गेल्या २५ वर्षाहून अधिक काळ १००% कर्ज वसुली हे या संस्थेचे खास वैशिष्ट्य आहे. या सहकारी संस्थेची स्वतःची दोन मजली सुसज्ज इमारत आहे. तसेच ३ स्वस्त धान्य दुकाने आहेत. तसेच ही संस्था सभासद शेतकऱ्यांना अत्यंत अल्प दरात सोनेतरण कर्ज उपलब्ध करून देते. विशेष म्हणजे सोनेतारण कर्जाची सेवा सभासदांना २४ तास उपलब्ध असते. ही सेवा महाराष्ट्रात एकमेव जवळा सोसायटीच्या सभासदांनाच मिळते हे विशेष. सभासद शेतकऱ्यांना बचतीची सवय लागावी म्हणून या सोसायटीच्या वतीने पिग्मीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

राज्यभर नावलौकिक असणाऱ्या जवळा विकास सेवा सोसायटीला प्रत्यक्ष भेट देऊन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे या सोसायटीच्या कामाची पाहणी करणार आहेत. यावेळी संस्थेच्या सर्व सभासद शेतकरी तसेच संचालक मंडळ या सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन जवळा विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सुनील आबा साळुंखे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??