ताज्या घडामोडी

सांगोला तालुक्याला तत्काळ पुराचे अतिरिक्त पाणी सोडा ; पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे कार्यकारी संचालकांना आदेश 

सांगोल्याच्या पाण्यासाठी दिपकआबांचा पाठपुरावा सुरूच 

सांगोला ; विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

 

एकीकडे राज्यात प्रचंड पाऊस होत असल्याने कृष्णा कोयना पंचगंगा नीरा अशा अनेक नद्यांना महापूर आला आहे. तर दुसरीकडे सांगोला तालुक्यातील शेतकरी आणि पशुपालक पाणीटंचाईने त्रस्त झाले आहेत. पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी टेंभू योजना, म्हैसाळ योजना आणि नीरा उजवा कालव्यातून दुष्काळी सांगोला तालुक्याला सोडावे अशा सूचना राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ हनुमंत धुमाळ यांना दिले आहेत. 

सांगोला तालुक्यातील शेतकरी पशुपालक आणि जनावरांना जीवनदान देण्यासाठी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा पाठपुरावा सुरूच आहे. याबाबत त्यांनी मंगळवार दि. २८ जुलै रोजी राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांना मुंबई येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी पाणीप्रश्नाचे निवेदन दिले यावर पालकमंत्री गोरे यांनी तत्काळ कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ धुमाळ यांना याबाबतचे आदेश दिले आहेत. 

निम्म्याहून अधिक पावसाळा उलटला तरीही सांगोला तालुक्यात पावसाने अद्याप हजेरी न लावल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचा हक्काचा खरीप हंगाम वाया गेला आहे. खरीप हंगामात कोणतीही शेतीपिके आणि चारा न आलेले जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही तालुक्यात गंभीर होऊ लागला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आणि पशुपालक दोघेही चिंतेत आहेत तालुक्यातील सर्वच जलस्रोत तळाला गेल्याने पिण्याच्या पाण्याचे संकट तालुक्यावर ओढावणे आहे म्हणून पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी टेंभू उपसा सिंचन योजनेतून मानगंगा नदीत आणि लाभक्षेत्रातील तलावांत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी कोरडा नदीत आणि लाभक्षेत्रातील तलावांत तसेच निरा उजवा कालव्याचे पाणी लाभक्षेत्राला सोडल्यास सांगोला तालुक्यातील शेतकरी, पशुपालक आणि लाखो पशुधनाला जीवदान मिळण्यास मदत होणार आहे. यासाठीच मंगळवारी माजी आमदार दिपकआबा यांनी पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांची भेट घेतली होती. यानंतर पालकमंत्री गोरे यांनी सांगोल्याच्या पाणी प्रश्नाची गंभीर दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करत कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना ताबडतोब तालुक्याला पाणी सोडण्याची सूचना केली. 

 

चौकट ; 

 

१) तहानलेले शेतकरी आणि जनावरांसाठी दिपकआबांचा पाठपुरावा सुरूच…!

 

एकीकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे दारातील मुकी जनावरे चाऱ्यासाठी टाहो फोडत आहेत. हक्काचा खरीप हंगाम वाया गेल्याने तालुक्यातील शेतकरीही चिंताग्रस्त झाला आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या आणि प्रश्नासाठी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी मात्र चांगलीच कंबर कसली आहे याबाबत त्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना लेखी निवेदन दिले, त्यानंतर सांगोला तहसील कार्यालयावर धडक देऊन प्रशासनालाही याबाबत पाणी सोडण्याची विनंती केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी थेट जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांनाही याबाबत निवेदन दिले त्यामुळे सांगोला तालुक्याला दुष्काळात पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??