घेरडी व आसपासच्या गावात अवैध ताडी विक्रीला ऊत, राज्य उत्पादन शुल्क विभागाने लक्ष देण्याची गरज… सुज्ञ नागरिकांमधून चर्चा

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
दिवसेंदिवस चर्चेत असलेले म्हणजे सांगोला तालुक्यातील घेरडी व अंतर्गत येणाऱ्या गावात अवैधरित्या ताडी विक्रेता,
सांगोला शहरासह तालुक्यातील वाढेगाव ग्रामीण भागात विविध ठिकाणे रस्ते , जिल्हा मार्ग , राज्य मार्ग,अशा विविध ठिकाणी अवैधरीत्या ताडीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे.काही धाब्यावर बेकायदेशीर ताडी विक्री केली जात आहे.त्यामुळे या ताडी विक्रीला अभय कोणाचे?असा सवाल उपस्थित केला जात आहे. तालुक्यातील अनेक नागरीक ताडी विक्री बंद करण्यात यावी, यासाठी आग्रही आहेत.त्याचबरोबर महीला वर्ग ताडी विक्री बंद करण्यात यावी यासाठी सकारत्मक दृष्टिकोन आहे.परंतू बेकायदेशीर ताडी विक्रीला पाठबळ कोणाचे?ताडी विक्रीला लगाम घालणे शक्य नसल्याने मत काही सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करतात.खय्रा अर्थाने तालुक्यातील यूवा पिढीला बर्बाद करणाऱ्या अशा अवैध व्यवसायाला भक्कम पाठबळ असल्यामुळे असा ताडीचा बेकायदेशीर धंदा सर्रास सुरू आहे.याचाच परिणाम गावात शांततेवर होतो.काही गावातील काही यूवकांनी ताडी पिल्याने पोट दुखुही लागते,व आयतेच मरणाला निमंत्रण मिळते.तरी या व्यवसायावर ताडी विक्रीतेला आपले नशीब चमकावायची संधीच मिळत आहे.तरी बेकायदेशीर ताडी विक्रत्येवर कायदेशीर कठोर कारवाई व ताडी विक्री बंद न, केल्यास लवकरच आंदोलन करणार असल्याचे नागरीकांमधून बोलले जात आहे.
भाग.नं.२ उद्या



