ताज्या घडामोडी
सण, उत्सव, निवडणुकीत सहकार्य करावे.. पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे पो.नि. राहुल देशपांडे यांचा सत्कार संपन्न..

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
सण, उत्सव व निवडणूक काळात पत्रकारांचे योगदान महत्त्वाचे आहे व त्यांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे कारण त्यामुळे बऱ्याच प्रश्नांची ही सोडवणूक होते असे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी सांगोला पोलीस स्टेशन मध्ये सत्कार प्रसंगी मत व्यक्त केले.
सुरुवातीस सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे यांच्या शुभहस्ते पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला व पोलीस प्रशासनास सहकार्य राहील असे रविराज शेटे यांनी यावेळी सांगितले. सदर प्रसंगी डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सतीश भाऊ सावंत, उपनगराध्यक्ष नितीन आबा इंगोले, पत्रकार सचिन धांडोरे, दत्तात्रय पवार, विनोद चंदनशिवे, करण मोरे, अक्षय मुढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन उपस्थित होते.



