ताज्या घडामोडी

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या , आशिर्वादाने अवैध दारू ताडी विक्री जोमात.  हप्तेखोरीमुळे, अवैध दारु विक्री ,पण कारवाई कधी? ,नागरीकामधूंन चर्चेला उधाण 

सांगोला /विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

 सांगोला शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीचे व्यवसाय आता पुन्हा नव्या जोमाने सुरू झाले असून, अवैध दारू विक्री व्यवसायिक पुन्हा सक्रिय झालेले दिसत आहेत. तालुक्यात राजरोसपणे सुरू असलेल्या या दारु विक्रीकडे मात्र राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाचे जाणीव पुर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. सध्या सरकारमान्य देशी व विदेशी दारू दुकानांतून पार्सलच्या रूपात दारू विक्री सुरू असून ही विक्री किंमतीपेक्षा जादा दराने विक्री सुरू असल्याचे दिसत आहे. तालुक्यातील पोलिस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागासह स्थानिक देशी दारू पासून तर विदेशी दारूपर्यंत सर्वच प्रकारची दारू प्रतिबंधित, वेळेत सर्रास मिळत आहे. या देशी व विदेशी दारूमध्ये काही

बनावटी दारूची विक्री होत असल्याचे मध्यपींमध्ये दबक्या आवाजात बोलले जात आहे.या दारु पोहोचविणा-तस्करांचेही राज्य उत्पादन शुल्क विभागाला चांगले संबंध असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भर चौकाचौकात राजरोसपणे दारुविक्री दुकाने थाटून खुलेआमपणे अवैध दारु विक्री केली जात आहे. भरचौकाचौकात सुरु असलेल्या या अवैध दारु विक्रेत्यांन राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीसांकडून कोणत्या प्रकारची कारवाई केली जात नाही. पोलीस विभागाचे कर्मचा वेळोवेळी अवैध दारु विक्रेत्यांकडून धाडी टाकून मुद्देमाल ज करतात परंतु जप्त केलेल्या विविध प्रकारचा विशिष्ट नंबरचा माल हा नेमका कोणत्या सरकारमान्य दुकाना पुरवठा केला गेला? याची साधी चौकशीही केली जात नाही त्यामुळे कितीही कारवाया केल्या तरी या दारू तस्कर कुणीही काहीही बिघडवू शकत नाही अशाच अविभार्वाद विक्रते वागताना दिसत आहेत. एखाद्या वेळी कारवाई झाली तरी पुन्हा नवीन जोमाने दारूची तस्करी करणे सुरू करता शहरासह तालुक्यातील अनेक गावात भर चौकाचौकात तालुक्यातील प्रमुख रस्त्यावरील ढाबे, हॉटेलवर सर्रास अवैध दारुची विक्री होते. राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाला या बाबत अनेक वेळा सूचना देऊनही प्रकाराकडे लक्ष दिले जात नसल्याने यावर वरदहस्त नेमक कुणाचा? असा सवाल तालुक्यातील जनतेमधून विचारला जात आहे.

▪️भाग नं.४ उद्या▪️..

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??