सांगोला,व ग्रामीण भागात अवैधरीत्या दारू ताडी बेकायदेशीर विक्री जोमात. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संबंधित अधिकारी गप्प का?

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
सांगोला तालुक्यातील आसपासच्या अंतर्गत येणाऱ्या एक नराळे गाव सोडून प्रत्येक गावात बेकायदेशीर दारू ताडी विक्री जोमात सुरू असताना,याकडे पोलीसांना ,जो कोणी बेकायदेशीर दारू विक्री करतो,त्यांच्यावर कारवाई न करता,ठरलेली मंथली रक्कम त्या झिरोच्या मार्फत घेऊन,त्या हिरो ला पण मी काय एखादा वरिष्ठ अधिकारी च असल्यासारखे वाटत आहे,परंतू त्या सांगोल्या मधील संबंधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे ,या दारू मुळे अनेक जणांचे संसार उद्धवस्त झाले असून,काही लहान मुले ही दारू व्यसनाधीन झाले आहेत,तरी हा महीलांना दारु मुळे होणारा त्रास, विद्यार्थ्यांना शाळेत जात असताना,काही जण दारु पिऊन चौका चौकात गोंधळ घालतात याला आळा बसविण्यासाठी पोलिसांनी वेळीच त्या दारु विक्रेतेवर कारवाई केल्यास, विद्यार्थी, महिलांना कोणीही दारु पिऊन चौकात गोंधळ घालणार नाही.अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.



