ताज्या घडामोडी

डिकसळ ग्रामपंचायत सरपंच मा.जिजाबाई करांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण.

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

८० व्या स्वतंत्र दिनानिमित्त डिकसळ ग्रामपंचायत आवारात ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडला. याप्रसंगी त्यांनी राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली आणि उपस्थित सर्वांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.तलाठी कार्यालय जि.प.मराठी शाळा,आश्रम शाळा ध्वजारोहण साजरा करण्यात आला. यावेळी गावातील भारतीय सैन्यात सेवा बजावून निवृत्त झालेल्या माझ्या सैनिकांच्या हस्ते ही ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने वातावरण भारावून गेले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते भाषणे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून स्वातंत्र्य दिनाचा आनंद लुटला. 

यावेळी डिकसळ गावातील सरपंच,तलाठी ग्रामसेवक ग्रामपंचायत आजी-माजी सर्व पदाधिकारी, सदस्य शिक्षक विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??