ताज्या घडामोडी

गाडीला कट का मारला म्हणून, पृथ्वीराज बनसोडे याला चौघांकडून रॉडने मारहाण पोलिसांकडून फिर्याद दाखल करण्यास टाळाटाळ 

सांगोला/विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

दि.27 ऑगस्ट 2026 रोजी कामावरून घरी जात असताना स्विफ्ट कारमधून उतरून तू गाडीला कट का मारला म्हणून चौघांनी दुचाकीवरील पृथ्वीराज बाळासाहेब बनसोडे (वय ३०) यास शिवीगाळ, दमदाटी, लोखंडी रॉडने मारून जखमी केल्याची घटना शहरातील कडलास नाक्यावर घडली.

 

शहरातील फॅबटेक कॉलेजच्या पाठीमागे राहात असलेले पृथ्वीराज बनसोडे हे सूतगिरणीवरील काम करून घरी दुचाकीवरून येत असताना कडलास नाक्यावर विना नंबर काळ्या रंगाच्या पीजी लिहिलेल्या स्विफ्ट कारमधून

 

उतरून तू गाडीला कट का मारला म्हणून पीयूष ऊर्फ डुल्या गावडे (वय २५, रा. धनगर गल्ली) व त्याच्यासमवेत असलेल्या तीन अनोळखी इसमांनी शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच पीयूष गावडे याने पृथ्वीराज यांच्या डाव्या खांद्यावर व डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. भांडण सोडवण्याकरिता पृथ्वीराज याचा आते भाऊ अतुल काटे हा प्रयत्न करीत असताना त्यालाही धक्काबुक्की केली म्हणून पीयूष गावडे व इतर तीन अनोळखी इसम यांच्याविरुध्द पृथ्वीराज बनसोडे यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??