अनेक वर्षांची प्रवाशांची प्रतीक्षा संपली; भागोजी हराळे माजी सैनिक यांच्या पाठपुराव्याला यश प्रवाशांच्या सोयीसाठी अखेर बस थांबा मंजूर.

सांगोला विशेष प्रतिनिधी-
विकास गंगणे
मो.९८८१५८३९३५
अनेक वर्षांपासून डिकसळ फाटी पासून १ किं.मी अंतरावर जत कडे रस्त्याच्या पुर्व बाजूला करांडे हराळे वस्ती असून या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना बस थांबत नसल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच नियमित प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन हराळे मेजर यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला.
प्रवाशांची ही महत्त्वाची मागणी लक्षात घेऊन त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून येथे अधिकृत हराळे बस थांबा मंजूर करून देण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना बससेवेचा लाभ घेणे अधिक सोयीचे होणार आहे.
बस थांबा मंजूर झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, हराळे मेजर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल प्रवाशांकडून व ग्रामस्थांकडून कौतुक व्यक्त होत आहे.
प्रवाशांच्या अनेक वर्षांच्या मागणीला मिळाला न्याय!
भागोजी हराळे मेजर यांच्या पाठपुराव्याला अखेर यश! यावेळी गावातील मा.सरपंच तुकाराम भुसनर सर, संतोष करांडे तंटामुक्ती अध्यक्ष अशोक करताडे चालक वाहक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



