ताज्या घडामोडी

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या खात्याशी संबंध नसलेल्या, एजंटच्या सांगण्यावरून ताडी विक्रतेवर धाडी..

हप्त्याला आधी....मग कामाला कधी? वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज 

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

सांगोला शहरासह ग्रामीण भागात बेकायदेशीर दारू ताडी विक्री जोमात सुरू असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने,घेरडी भागात ताडी विक्रेता हाताशी जवळ धरून मंथली वसुली गोळा करण्याचा नवीन फंडाच चालू केला आहे.परंतू बेकायदेशीर दारू ताडी विक्रेत्यांनी रस्त्यावर गल्लीबोळातून विक्री मोठ्या प्रमाणात जाळे पसरले आहे.या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने ,अवैध धंदे सुरू असून याला जबाबदार कोण? अशी चर्चा सर्वसामान्य नागरीकामधूंन होत आहे.घेरडी अंतर्गत एका गावात ताडी विक्रीते कडून मंथली हप्ता घेऊन देखील,एकाच्या सांगण्यावरून धाड टाकण्यासाठी झीरोला सोबत घेऊन मनमानी कारभार या विभागाने केला आहे,अशी चर्चाही घेरडी आसपासच्या गावातून होत आहे.

तरी राज्य उत्पादन शुल्क विभाग हे मंथली हप्ता साठी तालुक्यातील एक एजंट जवळ धरला असून, त्यापण एजंटनी,घेरडी अंतर्गत गावातील मंथलु वसुली गोळा करण्यासाठी घेरडी व पारे येथील एजंट जवळ केला आहे. तेच एजंट काही दारू विक्रेते कडून हप्ता ही घेत नाही कारण तो 

राजकीय पुढारी असल्याने.त्यातूनच या विभागाच्या संबंधित बेकायदेशीर दारू ताडी विक्री बातमी आली तर, एजंटच्या सांगण्यावरून त्या दारू ताडी विक्रीतेवरती त्यांच्याकडून हप्ता घेऊन देखील धाडी टाकायच्या,नंतर त्या विक्रेत्याला बोलायचे बातमी येत आहे म्हणून आम्ही धाडी टाकतो.

अशी परिस्थिती निर्माण झाली असून, ग्रामीण भागात धंद्याचे मोठे प्रमाण वाढले असून शांतता सुरक्षितता धोक्यात आली आहे.सांगोला तालुक्यात अवैध व्यवसाय बाबतीत सुत्रे हलत असल्याची चर्चा सुरू आहे.याबात जिल्हा पोलिस प्रमुख यांनी तात्काळ लक्ष घालावे अशी मागणी नागरीकामंधून होत आहे.तालुक्यातील बेकायदेशीर दारू ताडी विक्री कोणाचे चालू ठेवायचे कोणाचे बंद करायचे, कोणाच्या धंद्यावर कारवाई करायची, हे येथील अधिकारी खात्याशी संबंध नसलेल्या ,एजंटच्या सांगण्यावरून हाताशी जवळ धरून कारवाई करीत आहेत.हे दारू विक्रेत्ये मंथली हप्ता देत असल्याने यांना कायद्याचा वचक नसल्याने मोकाट झाले आहेत.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??