पंढरपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजाला शिस्तीची जोड; निरीक्षक पंकज कुंभार यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक

सांगोला विशेष: प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
पंढरपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पंकज कुंभार यांच्या कार्यकाळात विभागातील कामकाजात शिस्त, नियोजन आणि नियमांची अंमलबजावणी यावर भर दिला जात असल्याचे चित्र आहे. अवैध मद्यविक्री, वाहतूक तसेच परवान्यांच्या नियमांचे उल्लंघन यासंदर्भातील तक्रारींची दखल घेऊन नियमानुसार कारवाई करण्यावर विभागाकडून भर दिला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी केवळ अवैध मद्यविक्रीवर कारवाई करण्यापुरती मर्यादित नसून परवानाधारक व्यवसायांवर नियंत्रण ठेवणे, शासनाचा महसूल सुरक्षित ठेवणे आणि मद्यविषयक कायद्यांची अंमलबजावणी करणे हीदेखील महत्त्वाची जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर निरीक्षक पंकज कुंभार यांच्याकडून विभागीय कामकाजात नियमबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्यावर भर दिला जात असल्याचे सांगितले जाते.
ग्रामीण भागातील अवैध मद्यविक्रीच्या तक्रारी, विनापरवाना व्यवसाय आणि नियमबाह्य प्रकार याबाबत नागरिकांकडून माहिती मिळाल्यानंतर त्याची पडताळणी करून कायदेशीर प्रक्रिया राबविणे आवश्यक असते. या कामात अधिकाऱ्यांची तत्परता आणि निष्पक्षता महत्त्वाची ठरते. त्यामुळे संबंधित विभागाच्या कामकाजाबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे.



