ताज्या घडामोडी

डिकसळ आश्रमशाळेत महात्मा गांधी जयंती उत्साहात

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

 सांगोला तालुक्यातीलडिकसळ येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि देशसेवेच्या विचारांची माहिती देण्यात आली.

 

विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या जीवनकार्यावर भाषणे, कविता व विविध उपक्रम सादर केले. स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेशही विद्यार्थ्यांनी दिला.

 

यावेळी आश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??