ताज्या घडामोडी
डॉ. खताळ दाम्पत्याच्या धनश्री दाताच्या दवाखान्याचे नवीन जागेत स्थलांतर
बारामतीत १६ वर्षांपासून अविरत सेवा; धनश्री डेंटल क्लिनिकचा नूतन वास्तूत शुभारभ

टेंभुर्णी /प्रतिनिधी
अमोल मदने
बारामती : येथील प्रसिद्ध दंतरोग तज्ज्ञ आमचे बंधू डॉ. धनंजय दत्तात्रय खताळ व डॉ. पूजा धनंजय खताळ हे गेल्या १६ वर्षांपासून ‘धनश्री दाताचा दवाखाना’ च्या माध्यमातून बारामतीकरांच्या सेवेत आहेत.
रुग्णसेवेचा प्रदीर्घ अनुभव आणि आधुनिक उपचार पद्धतीमुळे त्यांनी अल्पावधीतच रुग्णांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आणि अधिक सुसज्ज सेवा देण्याच्या उद्देशाने त्यांनी आपला दवाखाना आता नवीन, प्रशस्त जागेत स्थलांतरित केला आहे.
या नूतन वास्तूत त्यांची भेट घेऊन नवीन व्यवसायासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यापुढेही त्यांच्या हातून अशीच अविरत रुग्णसेवा घडत राहो, अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.
यावेळी मित्रपरिवार व हितचिंतक उपस्थित होते.
—



