ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या काळात सातबारा उताऱ्यासाठी ४० रुपये घेतल्याचा शेतकऱ्यांचा दावा; चौकशीची मागणी

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेला ऑनलाईन सातबारा उतारा काढताना जवळा व काही अंतर्गत येणाऱ्या काही गावांतील ऑनलाईन केंद्रांवर शेतकऱ्यांकडून ४० रुपये आकारले जात असल्याचा दावा काही शेतकऱ्यांनी केला आहे.

 

सातबारा उताऱ्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबत शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले असून, संबंधित आकारणी नियमानुसार आहे किंवा नाही, याबाबत स्पष्टता मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने या प्रकरणाची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन चौकशी करावी, शुल्क आकारणीचे नियम तपासावेत आणि अनियमितता आढळल्यास नियमानुसार कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

 

दरम्यान, ४० रुपये आकारणीबाबत संबंधित ऑनलाईन केंद्र चालकांची बाजू तसेच संबंधित विभागाचे अधिकृत म्हणणे अद्याप समोर आलेले नाही.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??