ताज्या घडामोडी

मंत्रालयात शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या – दौलतनाना शितोळे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी महत्त्वपूर्ण भेट

9767181216

 टेंभुर्णी पत्रकार अमोल मदने 

आज मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष तथा घोड धरण शेतकरी बचाव कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब यांनी सदिच्छा भेट घेतली.

 

यावेळी शिरूर तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन खंडित करण्यात आल्यामुळे शेती आणि दैनंदिन जीवनात निर्माण झालेल्या गंभीर समस्यांबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. वीज पुरवठा खंडित झाल्याने पिकांचे सिंचन ठप्प झाले असून, शेतीची कामे खोळंबली आहेत. ऐन हंगामात वीज नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, याकडे शितोळे साहेबांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

 

शेतकऱ्यांच्या या व्यथा गांभीर्याने ऐकून घेऊन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या प्रश्नाची तात्काळ दखल घेतली. शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावर लवकरच सकारात्मक आणि शाश्वत तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

 

यावेळी दौलतनाना शितोळे म्हणाले, “शेतकरी हा या देशाचा अन्नदाता आहे. त्याच्या वीज पुरवठ्याचा प्रश्न कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्षित होता कामा नये. शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी जय मल्हार क्रांती संघटना सदैव कटिबद्ध राहील.”

 

या भेटीमुळे शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??