ताज्या घडामोडी

कोपटे वस्ती परिसरात पोलिसांची कारवाई; बडा दोस्त वाहनासह वाळू जप्त

सांगोला विशेष प्रतिनिधी : विकास गंगणे

मो.9881583935

 

 

सांगोला तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाई केली असून, विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या अशोक लेलंड बडा दोस्त वाहनासह सुमारे ५ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी ओंकार दीपक फुगारे (वय २१, रा. मंगळवेढा, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे सुमारे ४.२४ वाजण्याच्या दरम्यान सांगोला शहराजवळील पंढरपूर बायपास ब्रीजच्या पाठीमागे, मंगळवेढा-सोलापूर रोडवरील कोपटे वस्ती परिसरात माण नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करून वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.

 

यावेळी आरोपी ओंकार फुगारे हा आपल्या ताब्यातील निळ्या रंगाच्या अशोक लेलंड कंपनीच्या बडा दोस्त वाहन क्रमांक MH 09 GJ 0987 मध्ये शासनाची रॉयल्टी न भरता व कोणतीही परवानगी न घेता अंदाजे एक ब्रास वाळू भरून वाहतूक करताना मिळून आल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 

या कारवाईत अंदाजे ५ लाख रुपये किमतीचे वाहन आणि ७ हजार रुपये किमतीची वाळू असा एकूण ५ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात भाग ५ गुन्हा रजिस्टर नंबर १०६१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२) व ३०५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस कॉन्स्टेबल संकेत भारत गोरे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून, पोलीस नाईक ६५८ शेख यांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपासही पोलीस नाईक शेख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

 

सांगोला तालुक्यात नदीपात्रातून विनापरवाना वाळू उपसा आणि वाहतुकीचे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. नदीपात्रातील नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण व्हावे आणि शासनाचा महसूल बुडू नये, यासाठी अशा प्रकारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??