रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार मा.ना. रामदासजी आठवले साहेब आज सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर:
▪️खंडू तात्या सातपुते▪️

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार मा.ना. रामदासजी आठवले साहेब दिल्लीवरून पुणे येथे आगमन होणार असून पुणे येथील कार्यक्रमास उपस्थित राहून तेथून इस्लामपूर जिल्हा सांगली येथील कार्यक्रमास उपस्थित राहून त्यानंतर विटा जिल्हा सांगली येथील दिवंगत सुरेश बारशिंगे यांच्या शोकसभेस उपस्थित राहून त्यानंतर ते सांगोला येथे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त भरत आण्णा शेळके व पंचायत समिती सदस्या वंदना शेळके यांच्या मुलाच्या मंगल परिणय सोहळ्याला हर्षदा ला़ंन मिरज रोड सांगोला येथे सायंकाळी सात वाजता उपस्थित राहणार आहे त्यानंतर सांगोला पंढरपूर मार्गे कुर्डूवाडी येथे जाणार असून त्यानंतर सिद्धेश्वर एक्सप्रेस ने मुंबईला रवाना होणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा सरचिटणीस खंडू तात्या सातपुते यांनी दिली आहे त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे साहेब , राज्य संघटक सुनील सर्व गोड, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस जितेंद्र बनसोडे,सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र बापू खरात, सोलापूर जिल्हा अध्यक्ष शामसुंदर उर्फ रवी गायकवाड , पक्ष निरीक्षक सांगोला तालुका चंद्रकांत वाघमारे यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली .




