भाजप शेकाप व मित्र पक्ष संधीचे सोने करणार का*?

सांगोला विशेष प्रतिनिधी विकास गंगणे मो.9881583935
सांगोला तालुक्यातील प्रमुख पक्ष शेतकरी कामगार पक्षाने भाजपला पाठिंबा दिल्यामुळे ही सांगोला नगर परिषदेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे त्यातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत असल्याने या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे तालुक्यात पहिल्यांदाच शेतकरी कामगार पक्षाने भाजपला त्याचप्रमाणे मित्र पक्षांना आपला पाठिंबा केवळ आणि केवळ शहर व तालुक्याच्या विकासासाठी दिला आहे हे अत्यंत मोठे व मोलाचे काम व त्याग त्यांनी केला आहे त्यामुळे या सभेला मोठे महत्त्व आहे अनेक वर्षे दुष्काळात हा तालुका होता आता या तालुक्यात विकासाचा सूर्य उगवणार हे आता निश्चित झाले आहे शहरामध्ये कमळ या चित्रावर माजी नगराध्यक्ष मारुती आबा बनकर हे आपले नशीब आजमावत आहेत त्याचप्रमाणे भाजपा शेतकरी कामगार पक्ष दीपक आबा साळुंखे पाटील गट व मित्र पक्षांनी त्यांना सहकार्य करण्याचे ठरविले आहे भाजप व मित्र पक्ष या संधीचे सोने करणार का? काही समाज मत देणार नाही असा उगाचच भास निर्माण केला जात आहे तो सपशेल खोटा व मृगजळ ठरणार आहे काही अपक्ष ही आम्ही निवडून येणार असे दावा करतात परंतु परिस्थिती तशी नाही खरी लढत ही शिवसेना, शहर विकास आघाडी अपक्ष बापूसाहेब भाकरे व इंजिनियर झपके यांच्यातच आहे वास्तविक धनुष्यबाणाचे वारे शहरात सोसाट्याने वाहत आहे अनेकांच्या तोंडी आनंद माने हे नाव आहे तर झपके यांनीही प्रचारात मुसंडी मारली आहे हे दुर्लक्षित करून चालणार नाही अपक्ष भाकरे यांना सर्वच पक्षातील नाराज मंडळीचा त्याचप्रमाणे युवकांचा मोठा पाठिंबा आहे त्यांचा समाजही मोठा आहे भाजप शेका पक्ष व मित्र पक्षांनी आता शेवटच्या दोन दिवसात कंबर कसली पाहिजे तरच विजयश्री ते खेचून आणू शकतील अन्यथा सर्व काही अलबेला असे समजून मतदारांना गृहीत धरणे आता चालणार नाही ते महागात पडेल मुख्यमंत्र्याबरोबर फोटो मुख्यमंत्र्याच्या सभेला जाणे म्हणजे निवडून येत नसते त्यासाठी अंग झटकून प्रयत्न करावे लागतात ते आता शेवटच्या दोन दिवसात करून दाखवा तरच विजयश्री खेचून आणू शकाल अन्यथा नाही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेमुळे शहरात एक वेगळे चैतन्य निर्माण होणार आहे त्याचप्रमाणे भाजपच्या व मित्र पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण व नवचैतन्य निर्माण होणार आहे याचा शहर विकास आघाडीला निश्चितच फायदा होईल परंतु रात्र वैऱ्याची आहे डोळ्यात तेल घालून काम करावे लागेल हेही तितके सत्य अपक्ष व इतर पक्षांनी वैयक्तिक गाठीभेटीवर भर दिला आहे तसाच भर आता भाजप शेतकरी कामगार पक्ष व मित्र पक्षांना दिला पाहिजे शहरात डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाला सर्वच युवकांनी पाठिंबा दर्शवला आहे त्याचाही फायदा त्यांनी घेतला पाहिजे भाजपला शेकापक्षाने पाठिंबा दिल्याने त्याचप्रमाणे काही नाराजांना तिकीट न दिल्याने पक्षात थोडीफार पडझड झाली आहे तीही दुरुस्त करावी लागेल शहरांमध्ये भाजपचे म्हणावे असे प्रस्थ नाही परंतु आता यानिमित्ताने भाजपला पाय पसरायला जागा मिळाली आहे त्याचा शेतकरी कामगार पक्ष व दीपक साळुंखे गट बरोबर असल्याने यावेळी रेकॉर्ड ही मंडळी करणार का? असा प्रश्न मतदार करत आहेत कारण आजवर दीपक साळुंखे व इतर एक पक्ष एकत्र असल्यास विजयश्री खेचून आणत असतात आता तीन पक्ष एकत्र झाले आहेत त्यामुळे निश्चितच रेकॉर्ड ब्रेक विजय झाला पाहिजे अशी मागणी शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमधून होत आहे परंतु या नेतेमंडळी म्हणावी अशी साथ देताना दिसत नाहीत गत वेळेस नवख्या असलेल्या राणीताई माने यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा सुमारे 2900 हून अधिक मतांनी पराभव केला होता ही सल यावेळी यानिमित्ताने हा पक्ष त्याचप्रमाणे सर्व मित्र पक्ष भरून काढतील अशी सर्वत्र चर्चा आहे शहराचा विकास झाला असे म्हणणाऱ्यांनी शहरात फिरून पहावे म्हणजे सत्य कळेल असे आता मतदार म्हणू लागले आहेत शहरात सर्वत्र धुराळा त्याचप्रमाणे खड्ड्याचे साम्राज्य आहे तात्काळ यावर उपाययोजना कराव्यात असे मागणी नागरिकातून होत आहे त्यातच थंडीचे दिवस असल्याने एखादी दुचाकी किंवा चार चाकी वाहन स्टेशन रोड किंवा इतर रोडने गेल्या सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरते यावर उपाययोजना तात्काळ करावी असे मागणी शहरातील नागरिक व मतदारातून होत आहे दुष्काळी सांगोला शहर व तालुक्यासाठी आता मुख्यमंत्री काय आपल्या पोतडीतून देतात यावर आज सर्व सांगोलकर व तालुक्याचे लक्ष लागले आहे त्यामुळे या सभेला आज महत्त्व आहे त्यातच आता प्रमुख सर्व पक्ष एक झाल्याने मोठी ताकद भाजपबरोबर निर्माण झाली आहे त्यामुळे शहरात आता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बनकर रेकॉर्ड करतील अशी चर्चा सर्वत्र आहे मुख्यमंत्र्याच्या सभेमुळे याला चांगलीच बळकटी मिळेल असा दावाही आता शहर विकास आघाडीतील कार्यकर्ते करत आहेत.


