आपला जिल्हा

सांगोल्यात अन्न सुरक्षेचा वाली कोण? संबंधित अधिकाऱ्यांचा संपर्क च नाही.

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

 

सांगोला शहरात अन्न सुरक्षेसारख्या मूलभूत विषयाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या अन्नपदार्थांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या कारभाराबाबत सांगोल्यात संताप व्यक्त होत आहे. एवढ्या मोठ्या शहरासाठी अन्न व औषध प्रशासनाचा स्वतंत्र अधिकारी उपलब्ध नसल्याने नागरिकांनी तक्रार नेमकी कोणाकडे करायची, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या कामासाठी स्वतंत्र

 

अधिकारी नेमलेला नसल्याची स्थिती असल्याने अन्नभेसळ, निकृष्ट व मुदतबाह्य खाद्यपदार्थ विक्रीसारख्या प्रकारांवर तातडीने कारवाई कोण करणार ?यासह तुकाराम मुंडें जर क्शन मोडवर असताना सांगोला विभाग मात्र झोपेत का? सवाल उपस्थित होत आहे.

 

राज्य स्तरावर प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा सहन न करणाऱ्या आणि तातडीच्या कारवाईसाठी ओळख निर्माण केलेल्या तुकाराम मुंडे यांच्या कार्यपद्धतीची राज्यात चर्चा होत असताना सांगोल्यात अन्न सुरक्षेचा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन घटनास्थळी धाव घेणारी यंत्रणा कधी उभी राहणार? अन्न प्रशासनाला

 

जाग येण्यासाठी आणखी किती नागरिकांनी तक्रारी करायच्या, असा सवाल उपस्थित होत आहे.

 

नागरिकांनी खाद्यपदार्थाबाबत तक्रार करण्याचा प्रयत्न केला तर सोलापूर येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधणेही अनेकदा कठीण ठरत असल्याच्या तक्रारी आहेत. दूरध्वनी क्रमांकावर संपर्क होत नाही किंवा तो सतत व्यस्त असल्याची नागरिकांची व्यथा आहे. परिणामी तक्रार नोंदविण्यास विलंब होतो. या कालावधीत संबंधित विक्रेत्याला संशयित खाद्यपदार्थ हटविणे, साठा बदलणे अथवा अन्य पुरावे नष्ट करण्याची संधी मिळू शकते.

 

अन्नपदार्थामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाल्यानंतर

 

केवळ तक्रारीची नोंद करून उपयोग काय? तक्रार प्राप्त होताच घटनास्थळी पोहोचून नमुने घेणे, पंचनामा करणे आणि आवश्यक ती कायदेशीर कारवाई करणे ही यंत्रणेची जबाबदारी आहे. मात्र अधिकारीच उपलब्ध नसतील आणि संपर्क व्यवस्था कुचकामी असेल तर नागरिकांनी दाद मागायची तरी कोणाकडे, असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे. तक्रारी नंतर तत्काळ अधिकारी उपलब्ध होणे

 

नागरिकांच्या मागण्या

सांगोल्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचा स्वतंत्र अधिकारी नेमावा. नागरिकांसाठी स्वतंत्र तक्रार दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करावा. अन्न व औषध प्रशासनामध्ये समन्वय यंत्रणा निर्माण करावी. अन्नभेसळ व निकृष्ट खाद्यपदार्थ विक्रीविरोधात नियमित तपासणी मोहीम राबवावी.

 

आवश्यक आहे. त्याबरोबरच खाद्यपदार्थाचे नमुण्यांची तपासणी होणे गरजेचे आहे. त्यानंतरच कारवाई करणे शक्य आहे त्यामुळे अशा प्रकारची यंत्रणा सांगोल्यात प्रत्यक्षात कधी दिसणार, हा खरा प्रश्न आहे. अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारींसाठी प्रभावी, सहज उपलब्ध आणि तत्काळ प्रतिसाद देणारी स्थानिक यंत्रणा सांगोल्यात उभी करावी, अशी मागणी होत आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??