
सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
घेरडी पोलीस औट पोस्त हद्दीत अवैध धंदे अक्षरशः ‘सिस्टिमचा भाग’ झाल्याची चर्चाच जोर धरू लागली आहे. मटका, जुगार, अवैध दारू यांसह शासनाने निषिद्ध ठरवलेले विविध धंदे रस्त्याकाठी उघडपणे चालू असल्याने घेरडीत कायद्याला वचक उरला आहे की नाही?” असा सवाल नागरिकांतून सातत्याने उपस्थित होत आहे.
अवैध धंद्यांमधून मिळणाऱ्या पैशांमुळे नव्या लोकांनीही या चक्रात उडी घेतली असून, पोलिसांसमोर “नाकापेक्षा मोती जड” अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. काही ठिकाणी “काहीही करा, पण आमचे बघा” या धंद्यांना निर्भय छत्रछाया मिळत असल्याची चर्चा आहे.
‘एंट्री’च्या नावाखाली उघडपणे
मटका-जुगार-अवैध दारू रस्त्याकाठी निर्भयपणे; ‘एंट्री’च्या नावाखाली पैशांची उकळपट्टी, नागरिकांत संताप
साहेब खूप चिडलेत… अवैधरीत्या धंदे बंद करा, अन्यथा कारवाई करा , या भागात पोलीसांकडून अवैधरीत्या धंदे वाल्यांना बोलले जात आहे.
पैशांची उकळपट्टी सुरू असून, वाढत्या अवैध व्यावसायिकांमुळे हे ‘एंट्रीवाले’ अधिकच धनाढ्य होत असल्याची नागरिकांची उपरोधिक प्रतिक्रिया “आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन!” – गावोगाव ऐकू येत आहे.
दारूचा मोठ्या प्रमाणात व्यापार सुरू असल्याने व्यसनाधीन व जुगारी वर्गाची वर्दळ वाढू लागली आहे. परिणामी, छोट्यामोठ्या चोऱ्यांच्या घटना वाढल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत .
किंग”ना नेमके कोणाचे पाठबळ आहे, यावरही परिसरात चर्चा रंगली आहे. नागरिकांनी थेट पोलिसांवर बोट उचलत, “कलेक्शनमध्ये अधिकारी व्यस्त, धंदे मात्र फुल्ल फॉर्मात” अशी टीका केली आहे.
घेरडी व आसपासच्या गावातील गावठी दारूधंद्यांकडून ‘हप्ता’ वाढवण्याचा प्रस्ताव समोर आल्याची मोठी चर्चा सध्या रंगली आहे. बिट अंमलदारांनीच “साहेबांनी हप्ता वाढवायला सांगितला; आम्हालाही वरच्या अधिकाऱ्यांना द्यावा लागतो” असे संकेत दिल्याचा दावा एका अवैध धंदेवाल्याने गुप्त चर्चेत केल्याचे समजते. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी अवैध धंदे मोडीत काढण्याचे स्पष्ट आदेश दिल्यानंतरही स्थानिक पातळीवर हप्ता वाढवून
मागितला जात असल्याने नागरिक संभ्रमात आहेत. त्यामुळे “कारवाई खऱ्या अर्थाने अवैध धंदेविरुद्ध आहे की फक्त दरवाढीसाठी?” असा प्रश्नच शहरात सर्वाधिक चर्चेत आहे. कथित ‘सेटलमेंट’ संस्कृतीमुळेच
घेरडी परिसरातील गावठी दारूधंद्यांकडून ‘हप्ता’ वाढवण्याचा प्रस्ताव समोर आल्याची मोठी चर्चा सध्या रंगली आहे. बिट अंमलदारांनीच “साहेबांनी हप्ता वाढवायला सांगितला; आम्हालाही वरच्या अधिकाऱ्यांना द्यावा लागतो” असे संकेत दिल्याचा दावा एका अवैध धंदेवाल्याने गुप्त चर्चेत केल्याचे समजते. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी अवैध धंदे मोडीत काढण्याचे स्पष्ट आदेश दिल्यानंतरही स्थानिक पातळीवर हप्ता वाढवून मागितला जात असल्याने नागरिक संभ्रमात आहेत. त्यामुळे “कारवाई खऱ्या अथनि अवैध धंदेविरुद्ध आहे की फक्त दरवाढीसाठी?” असा प्रश्नच शहरात सर्वाधिक चर्चेत आहे. कथित ‘सेटलमेंट’ संस्कृतीमुळेच गावठी दारू, अवैधरीत्या धंदे वाल्यांना व्यवसायांना संरक्षण मिळत असल्याची भावना जनतेत बळावली असून, नागरिकांनी तातडीने ठोस व परिणामकारक कारवाई करण्याची मागणी प्रशासनासमोर केली आहे.
भाग नं.२ उद्या वाचा



