आपला जिल्हा

सिबिल स्कोअरमुळे गोरगरीब जनता आर्थिक संकटात; प्रशासनाकडून निर्णयाची अपेक्षा..

नागरिकांना नवीन कर्जापासून वंचित राहावे लागतेय

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

सर्वसामान्य व गरीब अर्जदारांच्या अडचणी लक्षात घेऊन सिबिल स्कोअर प्रणालीवर नियंत्रण आणण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. कर्ज परतफेड उशिरा झाल्यास किंवा आर्थिक अडचणींमुळे हप्ते थकले की संबंधित व्यक्तीला डिफॉल्टर यादीत टाकले जाते. यामुळे इतर बँका किंवा वित्तीय संस्था नवीन कर्ज देण्यास नकार देतात. परिणामी कर्जदार पूर्णपणे आर्थिक अडचणीत सापडतो.

 

सांगोला तालुक्यात पोलीस टाईम्स न्यूज नेटवर्क चे प्रतिनिधी विकास गंगणे यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, तालुक्यातील गोरगरीब नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत. आजारपण, शेतीतील नुकसान, रोजगाराचा अभाव किंवा कौटुंबिक अडचणींमुळे कर्ज वेळेत फेडणे शक्य होत नाही. अशावेळी डिफॉल्टरमध्ये नाव गेल्यानंतर पुन्हा कुठल्याही बँकेकडून किंवा फायनान्स कंपनीकडून मदत मिळत

नाही. यामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट होत असल्याचे समोर आले आहे.

सिबिल स्कोअरचा वापर करताना गरीब व शेतकरी वर्गासाठी वेगळी सवलत किंवा पुनर्वसन योजना असावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. अन्यथा कर्जबाजारीपणातून बाहेर पडण्याचा मार्ग कायमचा बंद होतो आणि कुटुंबावर मानसिक व आर्थिक ताण वाढतो. सरकारने या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून सिबिल नोंदणी प्रक्रियेत सुधारणा करावी आणि कर्जदारांना पुनर्रचना तसेच सवलतीची संधी द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत लवकर निर्णय न झाल्यास सर्वसामान्य अर्जदारांच्या अडचणी आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??