ताज्या घडामोडी

राज्य उत्पादन शुल्क विभागाला वसुलीचा मोह सुटेना. तसं सिंघम’ अधिकारी पंकज कुंभार लय’च भारी,पण सांगोल्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची नजर मात्र हप्त्यावरी.

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेले म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभाग.तसेच सांगोला व ग्रामीण भागात बेकायदेशीर दारू ताडी विक्री मोठ्या प्रमाणात जाळे पसरले असून, त्यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा ,राज्य उत्पादन शुल्क विभाग झिरोला हाताशी धरून मंथली वसुलीत मग्न असल्याचे नागरीकामंधून बोलले जात आहे.तसेच शहरात व ग्रामीण भागात काही दारू ताडी विक्री जोमात सुरू असून,त्या विक्रेत्याकडून संबंध जवळ असल्याने मंथली हप्ता घेत नाही,अशी चर्चा सर्वसामान्य नागरीकामधूंन होत आहे.काही अवैधरित्या धंदेवाल्यांनी मंथली हप्ता नाही दिला तर,कोणच्यातरी सांगण्यावरून धाडी टाकयच्या अशी परिस्थिती तालुक्यात नागरीकांना पहावयास मिळत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग सांगोल्यात आल्यानंतर कोणत्या धंदेवाल्यावरती कारवाई करायची, अशी ठरवून कारवाई केली जाते.तर काही दारू विक्रेते कडून हप्ता ही घेतला जात नाही. एकाला तुपाशी तर दुसऱ्या विक्रेत्याला उपाशी.म्हणजे जो विक्रेता मंथली हप्ता देत नाही त्यावर कारवाई करायची असा अन्याय या विभागांकडून होत आहे.अशा या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे असे सुज्ञ नागरिकांमधून बोलले जात आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??