मंगळवेढ्यातील तलाठी निलंबित, परंतु सांगोला तालुक्यातील तलाठ्यांकडून गैरव्यवहार झाला असेल तर ,त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होईल का? शेतकऱ्यांमधून चर्चा
सहामहीन्यापुर्वी खरेदी विक्री झाली,परंतू नोंदच नाही

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून आलेला निधी तलाठी यांच्याकडून कमी अनुदान देणे आधी तक्रारी आल्याने याप्रकरणी चौकशी करून यात तथ्य आढळून आल्याने, मंगळवेढा तालुक्यातील चिखलगी निंबोणी येतील तलाठी बी के कुंभार यांना निलंबित करण्याची कारवाई जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली आहे. परंतु सांगोला तालुक्यातील काही गावांमध्ये तलाठ्यांनी काहीतरी शेतकऱ्याकडूनदेवाण-घेवाण करून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शासकीय मदत मिळवून देण्यासाठी शासन नियमापेक्षा कमी अनुदान रक्कम देणे मलीद्याची मागणी करणे अशी परिस्थिती सांगोला तालुक्यातील काही गावांमध्ये तलाठ्याकडून होत होती.सोलापूर जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात यंदा अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले होते . तसेच तालुक्यातील गावांमध्ये काही शेतकऱ्यांच्या खरेदी विक्री नोंदी ही झाली आहेत. परंतु काही तलाठ्याच्या मनमानी कारभारामुळे सहा महिन्यापासून नोंदी सातबारा वरती अंमलच नाही अशा या मनमानी काम करणारा तलाठ्यामुळे शेतकऱ्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे. परंतु सांगोला तालुक्यातील काही तलाठी शेतकऱ्याला त्रासदायक ठरत असून त्या तलाठ्याच्या कामाची चौकशी व शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा अनुदान बाबत, सांगोल्याचे नूतन तहसीलदार यांनी योग्य ती चौकशी करून कारवाई करावी अशी ही चर्चा तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.



