आपला जिल्हा

आलेगाव येथे वन्यजीव प्राणी हरीण ची शिकार, मात्र आरोपी फरार,

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

सांगोला तालुक्यातील आलेगाव येथे

02 (हरीण) यांची शिकार 

दिनांक 12.12.2025 रोजी सकाळी 11.00 वाजणेच्या दरम्यान गुप्त माहितीनुसार श्री. सागर मगर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला, जे. जे. खोंदे वनपाल सांगोला, प्रतिभा जलदावार वनरक्षक सांगोला, जगताप वनरक्षक, इंगोले वनरक्षक, वाघमोडे वनपाल, मुंढे वनरक्षक, वनमजूर सर्व यांनी मौजे आलेगाव, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर येथे श्री. नितीन मवाली शिंदे, वय वर्ष 28, यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या घरी वन्यजीव प्राणी प्राथमिक अंदाजानुसार काळवीट (हरीण) यांचे मांस (मटन) 6.880 kg इतके आढळले. तसेच वन्यप्राणी पकडणेचे लाकडी (जाळे) पिंजरे -02, नायलॉन दोरी जाळे 06, सतुर लोखंडी -01, लाकडी ठोकळा 01, लोखंडी सुरी 01 इत्यादी साहित्य जप्त केले. नितीन मवाली शिंदे वय वर्ष संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 2 (16),9,39,50,51 अन्वये असून त्याचा शोध सुरू आहे. 03, प्लास्टिक पोते 02, स्टील पाटी 28 राहणार यांच्या विरोधात वन्यजीव वनगुन्हा नोंद केला. तसेच आरोपी फरार झाला आहे.

सदरच्या वन्यजीव प्राणी मांस मा. पशुधन विकास अधिकारी वर्ग (अ) वाकी-घेरडी यांच्याकडून शिलबंद करून ते पुढील तपासणी करिता फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात येणार आहे. सदर वनगुन्हे कामी 1) PSI संजय राऊत 2) पोलीस हवालदार 136 जमीर शेख, पोलीस पाटील आलेगाव दिलीप पाटील यांनी मदत केली.

 

वन्यप्राणी तरस, लांडगा, कोल्हा, ससा, काळविट, हरिण व इतर वन्यप्राणी एखा‌द्या गावात किंवा वस्तीवर जर आले तर त्यास कोणत्या प्रकारचा त्रास न देता ताबडतोब वनविभाग सांगोला यांच्याशी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक. 1) श्री. एस. व्ही. मगर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला 8788605476 2) श्री.जे.जे.खोंदे -वनपाल सांगोला 9272726251 3) श्री.एस. एल. वाघमोडे वनपाल जुनोनी 9767344883 4) श्री.एस.यु. जाधवर वनपाल कोळा 7775070285 5) श्री. के. एन. जगताप वनरक्षक महुद बुः। व सांगोला 9309155905 या वरील फोन नंबर वर संपर्क साधावा. लोकांना आवाहन करण्यात येते की, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांचे संरक्षण करणे व वन्यप्राण्यांचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.

 

मा. कुलराज सिंग, उपवनसंरक्षक सो, वनविभाग सोलापूर, मा. ऐश्वर्या शिंदे, मा. सहा. वनसंरक्षक, वनविभाग सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र सांगोला यांचे मार्फत पुढील तपास सुरु असुन नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी वनविभागास सहकार्य करावे.

(एस.व्ही. मगर) वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे) सांगोला.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??