आपला जिल्हा

पी एस आय राऊत अधिकाऱ्याची नेमणूक असूनही घेरडी भागात कारवाई शून्यच ! राऊत यांच्या दिखाऊ, कारवाईविरोधात संताप :

पी एस आय राऊत साहेब यांची तात्काळ बदली करा' सामाजिक कार्यकर्त्यांची ठाम मागणी

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

सांगोला पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या, पोलिस औट पोस्त घेरडी बीट साठी शासनाने पी एस आय दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करून न कायदा-सुव्यवस्था मजबूत – करण्याचा प्रयत्न केला असला, व तरी प्रत्यक्षात घेरडी व आसपासच्या गावात मात्र परिस्थिती ‘जैसे थे’च = असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. घेरडी पोलिस बीटचे पी एस आय हे कारवाईच्या नावाखाली केवळ न दिखाऊपणा करत असल्याचा आरोप आता उघडपणे सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

 

घेरडी बीटला राऊत आल्यापासून अवैध दारू व जुगारधंद्यांबाबत सातत्याने भरदिवसा चौका चौकात चालू आहे.तक्रारी, व बातम्या प्रसिद्ध होत असतानाही प्रत्यक्ष न कारवाई मात्र शून्य आहे.

 

मोठ्या फौजफाट्यासह होणारे छापे, गाड्यांचे ताफे आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती एवढेच चित्र दिसते; मात्र एकही दारूची बाटली, एकही आरोपी हाती लागत नाही. यामुळे पोलीस प्रशासनाच्या हेतूबाबत गंभीर संशय निर्माण झाला आहे. शासनाने पी एस आय 

 

अधिकारी दिला, पण खालच्या पातळीवर जर अधिकारीच अवैध धंदेवाल्यांना पाठीशी घालत असतील तर सर्व प्रयत्न व्यर्थ ठरणार, असा घणाघाती सवाल सामाजिक कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. पी एस आय राऊत यांच्या कार्यपद्धतीमुळे अवैध धंदे फोफावत असून सामान्य नागरिक, महिला व भाविक त्रस्त झाले आहेत, असा आरोप करण्यात येत आहे. घेरडी या गावात शाळा शिकण्यासाठी बाहेरच्या गावाहून विद्यार्थी विद्यार्थिनी येतात.तसेच या गावात विविध बँकाही आहेत या बँकेत व्यवहार करण्यासाठी वयोवृद्ध महिला यांची आवक जावक भरपूर असते. घेरडी गावचा बाजार प्रत्येक सोमवारी मोठ्या प्रमाणात भरतो. त्याच दिवशी दारू पिऊन भर चौकात दारु पिऊन कालवा करण्याची संख्या ही वाढली आहे. याचा हा नाहक त्रास महिलांना सोसावा लागतो.

 

घेरडी गाव हे वर्दळीचे ठिकाण आहे. मद्यधुंद चालक, टवाळ तरुणांचा उपद्रव आणि वाढते गैरप्रकार यामुळे गावातील शांतता धोक्यात आली आहे. असे असतानाही पोलिसांकडून ठोस कारवाई न होणे हे प्रशासनाच्या अपयशाचे जिवंत उदाहरण असल्याचे मत व्यक्त होत आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घूगे साहेब यांनी तात्काळ लक्ष घालावे.पी एस आय राऊत यांची बदली करून कर्तव्यदक्ष, निर्भीड अधिकारी घेरडीला नियुक्त करावा, अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. आता ‘कारवाई होणार की पुन्हा दिखाऊपणाच ?’ याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??