आपला जिल्हा

बातमीचा दणका.. पोलिसांच्या छाप्यातअवैध धंदेवाला एकच सापडला;   ते पण, दारुच्या बाटल्या नऊच;

पोलिसांच्या भूमिकेवर नागरिकांचा संशय

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

सांगोला पोलिस स्टेशन अंतर्गत घेरडी औटची अवैधरीत्या दारू विक्री ची बातमी येताच, मंथली वसुली करणाऱ्याला व पोलिसांना खडबडून जाग आली.त्यानंतर घेरडी अंतर्गत येणाऱ्या एका गावात पोलिसांनी रात्री अवैधरीत्या दारू धंदे वाल्यांवरती अचानक रात्री धाड टाकली.त्यानंतर त्या विक्रत्येजवळ दारुच्या चौदा बाटल्या सापडल्या,परंतु त्याच पोलिसांनी सांगोला पोलिस स्टेशन ला जाऊन त्याच्यावर कारवाई केली. त्याठिकाणी दारुच्या बाटल्या चौदा होत्या, पण पोलिसांनी नऊ बाटल्या सापडल्या म्हणून कांगावा केला. या घेरडी भागात पोलिस येत असताना मोठमोठ्या अवैधरीत्या दारू विक्रीत्येंना माहित असल्याने ,काही दारू विक्रेत्ये गावातून पळून गेले. हेच पोलिस या भागात जो कोणी हप्ता देतो त्या दारू विक्री त्यांना सांगतात की, आम्ही तुमच्या भागात येत आहेत. अशा या पोलिसांच्या कामगिरीमुळे नागरिकाला संशय येत आहे.

काही वर्षांपूर्वी 

 तालुका पोलीस स्टेशनकडे ग्रामस्थांनी दारु बंदिसाठी पाठपुरावा केला. मात्र या ठरावांनंतरही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मंगळवारी सायंकाळी घेरडी बीटच्या पोलिसांनी घेरडी अंतर्गत येणाऱ्या एका गावात दाखल झाले. मात्र या संयुक्त कारवाईदरम्यान कुठेही दारू किंवा जुगार आढळून न आल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे या बीट मध्ये सुमारे ३० ते ३२ ठिकाणी खुलेआम अवैध दारूविक्री व इतर गैरव्यवहार सुरू असल्याची चर्चा असून, नेहमी टपऱ्यांवर,

‘संपूर्ण दारुबंदी करा नाहीतर,, दारुड्याना

व दारूच्या टेबलावर

बाटल्या ठेवून विक्री केली

जाते, असे ग्रामस्थांचे म्हणणे

आहे. असे असताना एकाही

ठिकाणी दारू न सापडल्याने

पोलिसांच्या कामगिरीवर

प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

पोलीसच जर मॅनेज असतील तर न्याय कुणाकडे मागायचा? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गावातील अवैध धंदे बंद कसे होणार, असा संतप्त सूर ग्रामस्थांमध्ये आहे. जवळा घेरडी भागात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. ये-जा करणारे अनेक चालक मद्यधुंद अवस्थेत दिसून येतात, अशी तक्रार आहे. यामुळे अपघाताचा

 

धोका वाढला असून गावात अवैद्य दारू धंद्यामुळे महीला, वयोवृद्धांना -भगिनींना त्रास होत असल्याच्याही तक्रारी समोर येत आहेत. या गंभीर बाबीकडे जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष देऊन संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी गावांतून ग्राम स्थांकडून होत आहे. अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??