ना वरिष्ठांचा धाक ना कर्तृत्वाचा झेंडा ,घेरडीच्या पी. एस .आय .राऊत ला सुटेना वसुलीचा मोह

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
दिवसेंदिवस चर्चेत सहभागी असलेले,घेरडी पोलीस बीटचे पी एस आय राऊत साहेब यांच्या कृपाशीर्वादामुळे, अवैधरीत्या धंद्याला ऊत आला असून,या अधिकाऱ्यांला मंथली हप्ता असल्याने, कारवाई मात्र शून्य अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
जवळा घेरडी भागात अवैधरीत्या धंद्याच्या नावाखाली लूट सुरुच आहे .संबंधित असणारे वरिष्ठ अधिकारी आणि पोलिस कर्मचारी मात्र वसुलीचे काम अतिशय जोमाने करत आहेत. सर्वसामान्य नागरिक ,महीला आणि वाहनधारकांमधून घेरडी पोलिसांच्या विरोधात तीव्र नाराजी पसरली आहे
घेरडी बीट मधील वरिष्ठ अधिकारी आणि त्यांचे पोलीस कर्मचारी हे कोणत्याही पद्धतीने अवैधरीत्या धंदे रोखण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत नाहीत सध्या साखर कारखान्यावर ऊसतोड मजुरांच्या टोळ्या जवळा घेरडी अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये दिसत आहे ट्रॅक्टरच्या माध्यमातून ऊस वाहतूक
होताना दिसत आहे.दारु धंदेवाला बोलतो की, आमचे मंथली हप्ते असल्याने आम्ही कोणाला घाबरत नाही.तसेच घेरडी बीटचा पी. एस. आय.अधिकारी राऊत पण बोलतो मला काय फरक पडत नाही,
तरी पण वरिष्ठ अधिकारी तर मूग गिळून गप्प बसले आहेत. तर पोलिस कर्मचारी मात्र पठाणी वसुली करीत असल्याचे
चित्र दिसून येत आहेत. येणाऱ्या काळात
संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला जाईल असा इशारा अनेक सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्याऱ्यांनी दिला आहे.
काही सामाजिक कार्यकत्यांजवळ दबक्या आवाजात पी एस आय राऊत यांच्याकडून व्यक्त होत आहे की, माझ्या विरोधात कोणी ही गेले तरी, मला काय फरक पडत नाही . त्यामुळे या घेरडीत काम करण्यासाठी उत्साह नसलेल्या या अधिकाऱ्याला लवकरच गडचिरोली सारख्या ठिकाणी बदली करण्याची मागणी आता महीला व सामाजिक कार्यकत्यांकडून होत आहे.



