घेरडीचे ,श्रीनिवास करे सहीत, अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
अकलूज शिवरत्न बंगला येथे खासदार श्री. धैर्यशिलभैय्या मोहिते पाटील यांची सांगोला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष चे अधिकृत ५ जिल्हा परिषद गट उमेदवार व ८ पंचायत समिती गणातील सर्व उमेदवारांनी सदिच्छा भेट घेतली . यामध्ये घेरडी जिल्हा परिषद उमेदवार श्री अनिल मोटे, पंचायत समिती उमेदवार श्रीनिवास करे, सौ डॉ स्वाती परेश खंडागळे, कडलास जिल्हा परिषद गट सौ संचिता दत्तात्रय टापरे, अजनाळे पंचायत समिती गण श्री अक्षय भजनावळे, महूद जिल्हा परिषद उमेदवार श्री उत्तमदादा खांडेकर, चिकमहुद पंचायत समिती गण श्री. देवदत्त भोसले, चोपडी जिल्हा परिषद गट उमेदवार श्री विकास मोहिते, चोपडी पंचायत समिती गण श्री अनिल जगदाळे, राजुरी पंचायत समिती गण श्री काकासाहेब बंडगर, कोळा जिल्हा परिषद गट श्री सदानंद पांढरे,कोळा पंचायत समिती गण सौ.विद्या उल्हास बिले, हातीद गण श्री तात्यासो बाळासाहेब पाटील याप्रसंगी तालुकाध्यक्ष श्री दत्तात्रय सावंत, श्री महेश नलवडे व सर्व उपस्थित होते यावेळी या सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षात खासदार श्री. धैर्यशिलभैय्या मोहिते पाटील व कार्याध्यक्ष श्री. रवींद्रभाऊ पाटील यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला.



