आपला जिल्हा

घेरडी गणातून पंचायत समिती सदस्य उमेदवार, श्रीनिवास करे

जनतेचा विश्वास आणि विकासाचा निर्धार 

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.९८८१५८३९३५

 

 पंचायत समिती गणातील राजकारणाला नवा उत्साह आणि युवा दिशा देणारे नाव म्हणजे , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारी चिन्ह उमेदवार श्रीनिवास करे . जनतेच्या मनात स्थान मिळवलेला, तरुणाईंचा आवाज आणि विकासासाठी अहोरात्र धावणारा हा युवा नेता आता पंचायत समिती सदस्यपदासाठी उमेदवार .

 

श्रीनिवास करे हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजकारण, लोकसेवा आणि

 ग्रामपंचायत सदस्यांच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील घेरडी गावात काही ठिकाणी गरजूंना विविध , मोठ्या प्रमाणावर विकासनिधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या पुढाकाराने अनेक पायाभूत सुविधा, रस्ते, पाण्याच्या योजना आणि सार्वजनिक विकासकामे पूर्णत्वास गेली आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यतत्परतेचा ठसा

 

आज सर्वत्र दिसून येतो. घेरडी जिल्हा परिषद गटातील घेरडी पंचायत

समिती गणासाठी सर्व साधारण आरक्षण जाहीर झाल्यानंतर या जागेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर श्रीनिवास करे यांनी सदस्यपदासाठी

उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अर्ज दाखल केला. त्यांचे चिन्ह तुतारी असल्याने त्यांच्या या निर्णयाचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी स्वागत करत उत्साह व्यक्त केला आहे. स्थानिक नागरिकांमध्ये श्रीनिवास करे यांच्याविषयी सकारात्मक वातावरण असून, तरुण कार्यकर्त्यांमध्ये नवा गणातील जोश दिसून येतो. त्यांच्या उमेदवारीने या गणात नव्या राजकीय समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे.

 

  विकासाभिमुख कार्यशैली पाहता त्यांची दावेदारी अधिक बळकट मानली जात आहे.

 

जनतेचा विश्वास आणि कि विकासाचा निर्धार घेऊन श्रीनिवास करे घेरडी गणातील ग्रामविकासासाठी सज्ज झाले आहेत असे स्थानिकातून बोलले जात आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??