आपला जिल्हा

वझरे विद्युत उपकेंद्राचे काम रखडले.. नागरिकांमधून संताप व्यक्त काम सुरु न झाल्यास आंदोलनाचा  इशारा..-मा. सरपंच राजू पाटील

सांगोला /विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

       ग्रामीण भागातील सतत होणारे लोड शेडिंग कमी व्हावे व नागरिकांना, विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना होणारा त्रास वाचविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही होणारी गैरसोय लक्षात घेता ठीक ठिकाणी उपकेंद्र उभारण्याची योजना सुरू केली व याचाच एक भाग म्हणून वझरे ता. सांगोला येथे 33, 11,,kv उपकेंद्राचे काम मंजूर करून कामात सुरुवात झाली परंतु ठेकेदाराकडून काम रखडल्याने वझरे, चिनके, बलवडी, नाझरे येथील शेतकरी, विद्यार्थी, व्यावसायिक, नागरिकांतून संताप व्यक्त केला जात असून, काम लवकर सुरु न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 

    सध्या या उपकेंद्रासाठी लाखो रुपयांचे साहित्य येऊन धुळखात काठड्यात पडले आहे त्यास वाली कोण असा प्रश्न नागरिक विचारत आहेत व शासनाची कोट्यावधीची मालमत्ता धुळकात आहे याचा वरिष्ठांनी विचार करावा व याबाबत आजी.. माजी लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देऊन काम सुरू करण्याच्या सूचना द्याव्यात असे मा. सरपंच राजू भिकू अण्णा पाटील यांनी मागणी केली आहे. तसेच संबंधित उपकेंद्रास जागा उपलब्ध करून दिली, काम सुरू झाले परंतु सुमारे महिना झाले काम अर्धवट कंपाउंड करून बंद आहे व पाण्याअभावी बांधकाम वाळले असून तातडीने काम सुरू न झाल्यास आंदोलन करू असा इशाराही मा. सरपंच राजू पाटील यांनी दिला आहे. 

____________________________

   वझरे, बलवडी, चिनके येथील नागरिक, महिला, शेतकरी, विद्यार्थी यांना सुरळीत विद्युत पुरवठा व्हावा म्हणून वझरे उपकेंद्र आहे व त्यासाठी लागणारे लाखो रुपयाचे साहित्यही आले परंतु ठेकेदारांचे नियोजन नसल्याने काम बंद आहे व लवकर सुरु होण्यासाठी त्यांना सूचना देऊ..

मा. निवास नरबट उपकार्यकारी अधिकारी महावितरण नाझरे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??