जवळ्यात बाजार दिवशी ट्राफिक जाम, ट्राफिक पोलिसांची गरज

सांगोला विशेष /प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
सांगोला तालुक्यातील जवळा हे मोठ्या बाजारपेठेचे गाव असल्याने, नेहमीच येते वर्दळ असते, परंतु दर शुक्रवारी आठवडी बाजार असतो या बाजाराच्या निमित्ताने पंचक्रोशीतील अनेक लोक बाजार करण्यासाठी गावात येत असतात. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे चौका चौकात अनेक वाहने लावण्याने व अनेक भाजीपाला विकणारे ही रस्त्याच्या कडेला भाजी विकण्यास ठेवत असल्याने, वाहतुकीस अडथळा निर्माण होतो .व मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम होत असल्याने, मोठ्या समस्येला वाहनधारकांना व गावातील बाजारकरुना त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. ही समस्या घेरडीच्या बाजारात सोमवारी पण असते. येथील वाहतूक समस्येसाठी दर शुक्रवारी व सोमवारी घेरडीत ट्रॅफिक पोलीस नेमण्याची मागणी गावकरी करत आहेत. जर या समस्येची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.



